जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा । जिल्ह्याचे राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे आणि शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्यात बोद्वाड येथे झालेल्या बैठकीत आरोप-प्रत्यारोप करण्यात आले. त्यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. माजी आमदार आणि विद्यमान आमदार यांच्यात सुरू असलेल्या या आरोपांच्या फेऱ्यात राजकारण सुरु आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे पालक मंत्री गुलाबराव पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. की, ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी सयंम राखून आपल्या वडिलांच्या भूमिकेतून जावे. त्यांनी विकास कामांना प्राधान्य द्यावे. तसेच आ. चंद्रकांत पाटील यांनी एकमेकांवर टीकाटिपणी न करता आणि आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा विकास कामांना प्राधान्य द्यावे, आपल्या हातून चांगले विकास कामे व्हावी यासाठी त्यांनी प्रयत्न केले पाहिजे, असेही ना. पाटील यांनी सांगितले.तसेच खडसे यांनी वाद करण्यापेक्षा विकासाला महत्त्व दिले पाहिजे. चंद्रकांत पाटील यांनीदेखील मुलाची भूमिका निभवावी. दोघा नेत्यांनी संयम आणि शांतता बाळगावी असे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले आहे.