रावेर राजमुद्रा वृत्तसेवा | भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विचार तसेच त्यांनी सुरु केलेल्या योजना प्रत्येक गरीब कुटुंबाच्या घरा पर्यंत पोहचावे म्हणुन प्रत्येक कार्यकर्तेनी सज्ज राहावे उत्तम आरोग्य ठेवण्यासाठी आपला परिसर स्वच्छ ठेवण्याचे प्रतिपादन नंदकिशोर महाजन यांनी केले
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त तसेच भारताचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांचा वाढदिवसानिमित्त “सेवा व समर्पण अभियान” भाजपा तर्फे रावेर तालुक्यात राबविले जात आहे. या निमित्त आज भाजपा तर्फे स्वच्छता अभियान कार्यक्रम राबविले गेले गिरीब कुटुंबाना धान्य वाटप करण्यात आले यावेळी आयोजित विविध कार्यक्रमात जिल्हा बँक संचालक तथा जिल्हा परिषद सदस्य नंदकिशोर महाजन यांनी आपले विचार कार्यकर्ते यांच्या समोर मांडले
यांची होती उपस्थिती
“सेवा व समर्पण अभियान” निमित्त आयोजित पंचायत माजी शिक्षण सभापती सुरेश धनके भाजपा जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन समिती सभापती कविताताई कोळी तालुकाध्यक्ष राजन लासुलकर,पं.स.सदस्या अनिता चौधरी,भाजपा सरचिटणीस महेश चौधरी योगिताताई वानखेड़े,जुम्मा तडवी,पि के महाजन हरलाल कोळी संदीप सावळे आदी भाजपा लोकप्रतिनिधी कार्यकर्ते उपस्थित होते.
भाजपा तर्फे मोफत रेशन बॅग वाटप
पंतप्रधान गरीब कल्याण योजने अंतर्गत स्वस्त धान्य दुकाना मध्ये मोफत धान्य वाटप करण्यात आली यावेळी मोफत रेशन बॅग वाटप करण्यात आल्या जनतेला स्वच्छते बद्दल जन-जागृती करण्यात आली रावेर मस्कावद तांदवाडी रसलपुर येथे विविध कार्यक्रम घेण्यात आले.