जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा । राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी भाजप नेत्यांवर निशाणा साधला आहे. ‘हम तो डूबेंगे सनम लेकिन तुमको भी साथ लेकर डूबेंगे’ , फार झालं चार काय चार महिने भरके लेंगे पर लेकर डूबेंगे, अशा शायराना अंदाजात एकनाथ खडसे यांनी भाजप नेत्यांना इशारा दिला.
जळगावा येथे एका कार्यक्रमाला एकनाथ खडसे यांनी आपल्या खास शैलीत विरोधकांचा समाचार घेतला. हम तो डूबेंगे सनम लेकिन तुमको भी साथ लेकर डूबेंगे, फार झालं चार काय चार महिने भरके लेंगे पर तुमको लेकर डूबेंगे, काय राहिलं आता आयुष्यात सत्तराव्या वर्षी. कशासाठी? कशासाठी हे लोकं बदनामी करत आहेत, असा सवाल खडसे यांनी केला.
दरम्यान, खडसे यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करून अहवाल सादर करण्याचे आदेश राष्ट्रीय महिला आयोगाने जळगाव जिल्हा पोलिस अधीक्षकांना दिल्याने खडसे यांच्या अडचणीत पुन्हा चांगलीच वाढ झाली आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी खडसे यांच्या विरोधात दाखल केलेल्या पोलीस तक्रारीची कुठलीही दखल पोलीस घेत नसल्याने याबाबत अंजली दमानिया यांनी राष्ट्रीय महिला आयोगाकडे तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेत राष्ट्रीय महिला आयोगाने जिल्हा पोलिस अधीक्षकांना पत्र पाठवून खडसे यांच्याबाबत कायदेशीर कारवाई करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.