(जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा) माजी पालकमंत्री तथा आमदार गिरीश महाजन ह्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज जळगाव शहरातील सिविल हॉस्पिटल कोविड सेंटर बाहेरील नागरिकांना गोड जेवण वाटप करण्यात आले. गिरीश महाजन यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधून त्यांच्या कार्यकर्त्यांनी या उपक्रमाला जी. एम. फाउंडेशन अंतर्गत पार पाडले.
आमदार गिरीश महाजन यांनी आपल्या वाढदिवसाला कोणत्याही प्रकारची फलकबाजी तसेच कार्यक्रम न करता खर्च न करण्याचे आवाहन केले होते. जर खर्च करायचा असल्यास सामाजिक कामात करावा असेही सांगितले होते. या आवाहनाला दुजोरा देत या स्तुत्य कार्यक्रमाचे आयोजन जी. एम. फाउंडेशनचे पितांबर भावसार, अरविंद देशमुख, होनाजी चव्हाण, कल्पेश बेलदार, जयेश भावसार यांनी केले. या प्रसंगी लोकसंघर्ष मोर्चाचे भरत कर्डीले व त्याचे सहकारी उपस्थित होते.