यावल राजमुद्रा वृत्तसेवा । शहरातील एका 19 वर्षीय तरुणीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. यासंदर्भात पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी, की पूजा भैरवलाल प्रजापती असे तरुणीचे नाव असून फालक नगरात भैरवलाल प्रजापती यांचे कुटुंबीय गेल्या 35 वर्षांपासून राहत होते. रात्री जेवण करून कुटुंबासह ते झोपले होते. रविवारी सकाळी त्यांना जाग आल्यावर मुलगी पूजा ने घराच्या छताचा लोखंडी पाईपला दोरी बांधून गळफास घेण्याचे निर्देशनास आले.
याबाबत पोलिसांना कळविण्यात आले आहे. मयत युवतीचे श्ववविच्छेदन सविता शुभम तिडके यांनी केले. या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास सहायक फौजदार नेताजी वंजारी करीत आहे.