भडगाव राजमुद्रा वृत्तसेवा । भडगाव ते पारोळा या रस्त्याची अतिशय दुरवस्था झाली आहे. रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता! हे वाहन धारकांना अजिबात समजत नाही या रस्त्यावर शिवसेनेचे दोन आमदार महाविकास आघाडीच्या सतेत आहे.तर केंद्राच्या सतेत याच रस्त्याचे खासदार आहेत.हे सुद्धा अनेक वेळा या रस्त्यावर त्यांच्या एसी च्या गाड्या मधून प्रवास करतात. हा रस्ता किती जीवघेणा आहे हे यांनी पाहीला नसेल का.? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
याबाबत प्राप्त माहिती अशी की, भडगाव ते पारोळा मार्गावर रस्त्याची दुरवस्था झाली आहे. रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. रस्त्याच्या साइडपट्ट्या यावर्षीच्या पावसाने खचल्या आहेत. तसेच रस्ता अरुंद झाला आहे. रस्त्यावरील डांबर गायब झाले असून, मोठमोठे खड्डे पडले आहेत. पारोळा ते भडगाव १० ते २० किलोमीटर रस्त्यावरून जाताना व वाहनचालकांसह प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.पारोळा तालुक्याच्या चोरवड हद्दीतील गावापासून चार ते पाच किलोमीटर अंतरावर
एक ते दीड किलोमीटरचा वळणाची वाट आहे. या वळनावरच मोठमोठे खडे आहेत. आणि हा रस्ता दोन तालुक्यांच्या सीमेवर असून, या रस्त्यावरून वाहनांची गर्दी असते.
या रस्त्यावर चाळीसगाव पाचोरा जामनेर सोयगाव भडगाव धुळे औरंगाबाद या भागाकडे जाणाऱ्या वाहनांची संख्या जास्त आहे. रात्रंदिवस वाहतूक सुरु असते पण रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून, मोठमोठे खड्डे पडले आहेत. तसेच साइडपट्ट्या खचल्या आहेत. वाहनचालकांना या रस्त्यावरून व खिंडीतून जाताना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. गेल्या अनेक वेळा रस्त्यावर काही लहान मोठे अपघात झाले असून, जीवितहानी झाली आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाला या रस्त्याच्या दुरुस्तीबाबत कल्पना व पाठपुरावा करूनही बांधकाम विभागाकडून कोणतीही हालचाल केल्याचे दिसून येत नाही. या रस्त्यावर अपघात झाल्यावर बांधकाम विभागाला जाग येणार का? असा सवाल जनतेतून प्रश्न निर्माण होत आहे, विशेष म्हणजे हा रस्ता पाचोरा भडगाव मतदारसंघ व पारोळा एरडोल विधानसभा मतदार संघ असे दोन मतदारसंघात आहे पाचोरा भडगाव मतदार संघाचे लोकप्रतिनिधी आ किशोर पाटील व पारोळा एरंडोल मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी आ चिमणराव पाटील आहेत. हे दोन्हीही आमदार शिवसेनेचे आहे.शिवसेना महाविकास आघाडीच्या सतेत शिवसेना मुख्यमंत्री म्हणून राज्यांची धुरा सांभाळत आहे हा ज्या खासदारांनकडे येतो ते केंद्रात सतेत भाजप पक्षाचे खा उन्मेष पाटील आहेत. पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील आहे. तरी हा रस्ता जीवघेणा कसा .?या रस्त्याची दुरवस्था झाल्यामुळे वयोवृद्ध प्रवाशांना रस्त्यावरून जाताना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. तत्काळ रस्त्याची दुरुस्ती करावी.अशी मागणी पारोळा भडगाव वाहतूक दारांनी केली आहे