जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | शहरातील प्रिंप्राळा परिसरात सावखेडा शिवरा कडे जातांना संपूर्ण सत्याची चाळणी झाल्याने नागरिकांना रस्त्यावर वाहने तसेच चालणे मुश्किल झाले आहे. यामुळे स्थानिक नागरिकांना तसेच रस्त्या वरून वापर करणाऱ्या नागरिकांना रोजची समस्या ठरल्याने मनस्ताप व्यक्त केला जात आहे. सिमेंट चे रस्ते नाही देत तर मातीचे तरी द्या मात्र खड्ड्यापासून मुक्ती द्या अशी यातना दायक मागणी नागरिकांनी केली आहे.
महापालिकेत गेल्या सहा – सात महिन्यांपूर्वी सत्ता तर झाले शिवसेनेची सत्ता मनपा मध्ये आली शहरातील महत्वाची समस्या रस्ते दुरुस्ती चे काम हाती घेतले जाणार असल्याचे यावेळी उजळत्या सत्ताधाऱ्यांनी सांगितले होते, मात्र पावसाचे दिवस असल्याने रस्त्याची कामे करता येणार नसल्याचे देखील नंतर सांगण्यात आले. निधी असताना रस्त्याच्या कामाची मंजुरी घेऊन न ठेवल्याची तसदी देखील सत्ताधारी व प्रशासनाकडून घेण्यात आली नाही यामुळे प्राप्त झालेला निधी परत जाण्याची वेळ देखील मनपावर आली आहे. तर राज्यातील भाजप सरकार गेल्या नंतर स्थापन झालेले महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 100 कोटीच्या निधीवर स्थगिती दिल्याने शहरातील रस्त्याची विकासकामे खोळंबली आहे.
सत्ताधारी व प्रशासनाने तात्काळ नवीन रस्त्याच्या उभारणीच्या कामाला सुरुवात करावी काही प्रमाणात पाऊस देखील कमी झाला असल्याने रस्त्याची कामे मार्गी लावावी तसेच मनपा मध्ये सत्तेतील शिवसेनेने राज्यातील सत्तेचा वापर करीत विकास कामाच्या निधीवर मुख्यमंत्री ठाकरे यांच्या कडून स्थगिती उठवून घ्यावी अशी देखील मागणी यावेळी करण्यात आली आहे.
शहरातील काही रस्ते सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत असल्याने त्या रस्त्याची कामे सार्वजनिक बांधकाम विभाग करेल अशी त्या साठी निधी देखील तेच उपलब्ध करतील असे सांगितले जात होते मात्र शहरातील नागरिकांचा रोजच्या उपजीविकेचे साधन असलेल्या रस्त्यांचा पाठपुरावा मनपाने करणे देखील गरजेचे असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.