भुसावळ राजमृद्रा वृत्तसेवा । शिवसेनेला गतवैभव देण्यासाठी कार्यकत्यांनी शिवसेनेची संघटना मजबुत करावी आगामी काळात येणाऱ्या निवडणुकानमध्ये येणारे यश तुमचेच आहे, असे प्रतिपादन शिवसेनेचे रावेर लोकसभा मतदार संघाचे संपर्कप्रमुख विलास पारकर यांनी केले.
भुसावळ येथील मोरया लॉन्स मधील सभागृहात आयोजित केलेल्या शिवसेनेच्या आढावा बैठकीत ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख समाधन महाजन, रावेर लोकसभाचे उपसंघटक विलास मुळे, उपजिल्हाप्रमुख् प्रा. उत्तम सुरवाडे, उपजिल्हाप्रमुख डॉ.मनोहर पाटील, उपजिल्हाप्रमुख् प्रल्हाद महाजन, उर्दू विभाग अल्पसंख्यांक शिक्षकसेनेचे प्रमुख एलियाज, विधानसभा क्षेत्रप्रमूख संतोष सोनवणे, तालुका संघटन प्रा. धीरज पाटील, शहर प्रमुख नीलेश महाजन, शहर प्रमुख बबलू बऱ्हाटे , महिला आघाडी जिल्हा संघटिका पुनम बऱ्हाटे तालुका संघटिका भुराबाई चव्हाण, माजी तालुकाप्रमुख निळकंठ बऱ्हाटे, पंचायत समिती सदस्य विजय सुरवाडे, जिल्हा युवा अधिकारी चंद्रकांत शर्मा आदी मान्यवर उपस्थित होते.