(राजमुद्रा वृत्तसेवा) आज माजी जलसंपदा मंत्री आमदार गिरीष महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त, गेल्या दीड वर्षां पासून जनतेची अहोरात्र सेवा करणारे कोरोना योद्ध्यांचा आज भाजपच्या वतीने सन्मान करण्यात आला. जिल्हा सामान्य रुग्णालय, चेतनदास रुग्णालय, लोकसंघर्ष मोर्चा यांचे कोविड सेंटर, गगव्हर्नमेंट पॉलिटेक्निक येथील स्टाप नर्स, बेड असिस्टंट, सफाई कामगार, ब्रदर, सिस्टर व इतर कोरोना योद्ध्यांचा भाजप चित्रपट कामगार आघाडी जळगाव जिल्ह्याच्या वतीने सन्मान पत्र देऊन सत्कार करण्यात आला. सोबतच युवा ब्रिगेड फाउंडेशनच्या कोरोना योद्धांचाही सत्कार करण्यात आला.
कोरोनाच्या कठीण काळात या कोरोना योद्ध्यांनी सामान्य नागरिकांची जी सेवा केली आहे त्याचे फलित म्हणून आज नागरिकांचे जीव वाचले आहेत. कोरोनाच्या मानसिक तणावाच्या काळात या योद्ध्यांनी स्वतःवर संयम ठेवत कोरोना महामारीला हरवण्याचा शर्थीने प्रयत्न केला आहे त्यामुळे या सर्व देवदूतांचा आमदार गिरीश महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला.
सत्कारा प्रसंगी जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे, भाजपा चित्रपट कामगार आघाडीचे जळगाव जिल्हा अध्यक्ष तथा उत्तर महाराष्ट्र, सोलापुर जिल्हा प्रभारी भुषण भोळे, महानगर पालिकेचे स्थायी समिती सभापती श्री राजेंद्र घुघे पाटील, भाजपाचे जिल्हा अध्यक्ष दीपक सुर्यवंशी, सरचिटणीस विशाल त्रिपाठी, महेश जोशी ,भाजपा चित्रपट कामगार आघाडीचे जिल्हा सरचिटणीस सागर खुटे, महिला जिल्हा सरचिटणीस अबोली पाटील, जळगाव तालुका अध्यक्ष चेतन चौधरी, बोदवड तालुका अध्यक्ष उमेश गुरव, महानगर अध्यक्ष गौरव पाटील, महिला शहर उपाध्यक्ष कविता पाटील व बोदवड तालुका भाजपा कार्यकर्ते धनराज सुतार व इतर पदाधिकारी उपस्थित होते.