जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा । शहरातील संभाजी चौकात वृक्षतोड सुरू आहे अशी माहिती एका निसर्गप्रेमी नागरिकाने वन्यजीव संरक्षण संस्थेचे बाळकृष्ण देवरे यांना दिली. त्यानुसार बाळकृष्ण देवरे यांनी तात्काळ मनपा प्रभाग अधिकारी नेमाडे याना तक्रार करत वृक्षतोड थांबवुन कारवाईकरण्या साठी कर्मचारी पाठवण्या बाबत विनंती केली. तसेच वृक्षतोड बद्दल माहिती वी जे एस एस संस्था ग्रुप वर टाकताच संस्थेचे जगदीश बैरागी, राजेश सोनवणे, अमोल देशमुख यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पुढील वृक्षतोड थांबवली.
महारुख नावाचे दोन वृक्ष तोडण्यासाठी लाकूडतोडे त्या ठिकाणी दाखल झाले होते. एका झाडाची कत्तल करण्यात आली असल्याचे निदर्शनास आले. मनपा अधिकारी नेमाडे यांनी कर्मचारी सागर नंनवरे याना घटनास्थळी पाठवले लाकूडतोड्यांचे हत्यार जप्त करत विचारणा केली असता आम्हाला समोरच्या अपार्टमेंट मधील कुणीतरी परवानगी आहे झाड तोडा असे सांगितले म्हणून आम्ही तोडत होते असे सांगितले.
वन्यजीव संरक्षण संस्थेने सदर वृक्षतोड थांबवली असून एका झाडाचा जीव वाचवला सदर झाडे अपारमेन्ट च्या भिंती पासून 40 फूट अंतरावर झाड आहे आणि वरती वीजतारा नाहीत किंवा झाडं झुकलेला नाही कोणाला इजा होईल अशी स्थिती नाही विचारले तर उडवा उडवी ची उत्तरे मिळाली दोषींवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी जगदीश बैरागी वन्यजीव संरक्षण संस्था, व निसर्गप्रेमी, नागरिकांनी केली.