रावेर राजमुद्रा वृत्तसेवा । जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत माजी आमदार अरुण पाटील व विद्यमान संचालक नंदकिशोर महाजन तसेच राजीव पाटील पुन्हा आमने-सामने येण्याची दाट शक्यता आहे. तीघे निवडणुक लढविण्यासाठी इच्छुक असून कॉग्रेस कडून अद्याप चाचपणीच सुरु असल्याचे आ. शिरीष चौधरी यांनी सांगितले
रावेर तालुक्यातुन जिल्हा बँकसाठी संचालकपदाची निवडणूक होणार आहे. आर्थिक सामाजिक आणि रणनीतीक बेसवर आता पर्यंत ही निवडणूक झाली आहे. अत्यंत प्रतिष्ठेची मानली जाणा-या या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्हाचे लक्ष असते.सद्या रावेर तालुक्यातुन विकासो मतदारसंघातुन नंदकिशोर महाजन हे संचालक म्हणुन प्रतिनिधीत्व करत आहे.तर यंदा होणाऱ्या संचालक पदाच्या निवडणुकीसाठी माजी आमदार अरुण पाटील हे राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाकडून इच्छुक आहे. तर भारतीय जनता पक्षाने संधी दिल्यास पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे संचालक नंदकिशोर महाजन यांनी सांगितले.
तर कॉग्रेस पक्षाने स्वबळावर निवडणूक लढविण्याचा नारा दिला असला तरी अद्याप कॉग्रेसकडे उमेदवार नाही या संदर्भात आमदार शिरीष चौधरी म्हणाले की उमेदवारी संदर्भात एक महत्वाची बैठक घेतली जाईल अद्याप आमच्याकडे उमेदवार नाही बैठक घेऊन कार्यकर्ते यांच्याशी चर्चा करून उमेदवारी संदर्भात निर्णय घेतला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
माजी आमदार अरुण पाटील राष्ट्रवादी कडून इच्छुक आहे. तर भाजपा कडून नंदकिशोर महाजन इच्छुक आहे. जिल्हा पातळीवर राष्ट्रवादी,भाजपा आणि शिवसेना असे तिघे पक्षाचे लोक एकत्र येऊन सर्वपक्षीय पॅनल तयार करणार आहे. त्यामुळे रावेर तालुक्यातुन या पॅनलमध्ये कोणाला संधी मिळेल याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.
दरम्यान जिल्हा बँक निवडणुकीत कॉग्रेस पक्षाने स्वबळाचा नारा दिला आहे. त्यामुळे तालुक्यातुन जिल्हा बँकेला कॉग्रेस कोणाला उमेदवारी देईल याकडे लक्ष आहे.येथून उमेदवार निवडणुन आणण्याची जबाबदारी कॉग्रेस प्रदेशउपाध्यक्ष तथा आमदार शिरीष चौधरी यांच्या खांद्यावर असणार आहे.त्यामुळे उमेदवारी संदर्भात श्री चौधरी यांनी महत्वाची बैठक बोलवली आहे.