जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा । पालिकेच्या राजकारणात विविध घडामोडींचा वेग आला आहे. एकीकडे स्थायी समिती सभापती निवडीपूर्वीच्या हालचाली वाढल्या अाहेत तर दुसरीकडे बंडखाेरांच्या अपात्रतेसाठी कामकाज सुरू झाले. विभागीय अायुक्तांकडे पुढील सुनावणी २६ राेजी अाहे. दरम्यान, गटनेत्यांना पाचारण करणे तसेच स्थायी समिती सदस्यांची निवडीबाबत पुढच्या अाठवड्यात निर्णय हाेण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
महापाैर निवडीत भाजपच्या २७ नगरसेवकांनी गटनेते भगत बालाणी यांचा व्हीप नाकारत शिवसेनेला मदत केली हाेती. त्यामुळे भाजपतर्फे बंडखाेरांना अपात्र करण्यासाठी विभागीय अायुक्तांकडे तक्रार करण्यात अाली अाहे. याबाबत मंगळवारी नाशिक येथे कामकाज झाले. त्यात दाेन्ही पक्षाच्या वकिलांनी बाजू मांडली. नगरसेवकांच्या वतीने जबाब नाेंदवण्यात अाला. दाेन्ही पक्षांकडील कागदपत्रांची पूर्तता करण्याच्या सूचना करत पुढची सुनावणी २६ अाॅक्टाेबर राेजी निश्चित झाली. तक्रारदारांतर्फे अॅड. सतीश भगत यांनी काम पाहिले.
स्थायी समितीचे अाठ सदस्य निवृत्त हाेऊन पाच दिवस उलटले अाहेत. नवीन सदस्यांची निवड करण्यासाठी गटनेत्यांची बैठक हाेणे अपेक्षित अाहे. महापाैरांनी यासाठी पुढाकार घेणे गरजेचे अाहे; परंतु भाजपचा गटनेता काेण? यावरून वाद अाहे. महापाैर जयश्री महाजन काेणत्या गटनेत्याला पाचारण करतात याकडे लक्ष लागून अाहे.