(राजमुद्रा वृत्तसेवा) 31 मे रोजी राजमाता पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांची 296 वी जयंती येत असून कोरोना महामारीच्या काळातील शासकीय निर्बंध लक्षात घेता ही जयंती याही वर्षी घरगुती आणि साधे पद्धतीने साजरी करण्यात यावी असे आवाहन संभाजी ब्रिगेड विद्यार्थी आघाडी गवळी लहु व विशाल खडके यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
सध्या महाराष्ट्रात आणि देशात कोरोना या महाभयंकर आजाराचे संकट आलेले आहे. अशात 31 मे रोजी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती येत आहे. या पार्श्वभूमीवर धनगर समाजातील बांधवांनी होळकरांचा इतिहास तसेच धनगर समाजातील भविष्याची वाटचाल लक्षात घेऊन यावर्षीही अहिल्यादेवी होळकर यांची जयंती कुठलाही गाजावाजा न करता साधे पद्धतीने आपापल्या घरीच साजरी करावी असे आवाहन करण्यात आले आहे.
अहिल्यादेवी होळकर यांनी आपल्या कारकिर्दीत आदर्श रुपी जलसिंचनाची कामे, विहीर, रस्ते तलाव आदींची निर्मिती केली आहे. विविध ठिकाणी अन्नछत्र चालवली. शेतकऱ्यांच्या अन्नाची सोय केली. भारतात महिलांची 250 वर्षापूर्वी महिलांची फौज तयार केली. पहिला आंतरजातीय विवाह त्यांनी स्वतः घडवून आणला. त्यांचा हा सामाजिक भाव लक्षात घेऊन ‘अहिल्यादेवी मनामनात अहिल्यादेवी घराघरात’ असे बिद्र वाक्य ठेवून सर्व समाज बांधवांनी आपल्या घरात जयंती साजरी करावी. कुठलाही गाजावाजा न करता, डीजे मुक्त अशी जयंती सर्व समाज बांधवांनी आपल्या घरातच कोरोनाचे नियम पाळून जयंती साजरी करावी असे आवाहन संभाजी ब्रिगेड विद्यार्थी आघाडी गवळी लहु व विशाल खडके यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.