नंदुरबार राजमुद्रा वृत्तसेवा । नंदुरबार जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर होत आहे. यात आतापर्यंत ११ गटांचे निकाल घोषित झाले आहेत. अर्थात या निकालानंतर जिल्हा परिषदेवर शिवसेना काँग्रेसची सत्ता कायम असणार आहे. परंतु, शिवसेनेचे उपाध्यक्षपद धोक्यात असल्याचे चित्र सध्याच्या निकालावरून दिसून येत आहे.
नंदुरबार जिल्हा परिषदेच्या १८ गट व पंचायत समितीच्या १४ गणांसाठी पोटनिवडणुक होत आहे. या निवडणुकीत १८ गटांसाठी ३५ उमेदवार तर पंचायत समितीच्या १४ गणांसाठी ४१ उमेदवार रिंगणात आहेत. मंगळवारी (ता.५) झालेल्या निवडणुकीचा निकाल आज जाहीर होत असून नंदुरबार जिल्हा परिषदेच्या ११ गटांचे निकाल आतापर्यंत घोषित झाले आहेत. या निकालावरून जिल्हा परिषदेतील शिवसेना– काँग्रेसची सत्ता कायम असणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. शनिमांडळ गटातून शिवसेनेच्या जागृती सचिन मोरे 518 मतांनी विजयी झाल्या आहेत.