जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा । कोरोनाकाळात देखील शेतकऱ्यांनी वेळेवरती विजबिले भरले पाहीजे यासाठी शासनाने त्यांच्या मागे तगादा लावला आहे. याला राज्य शासन जबाबदार आहे, लोकप्रतिनिधी याला कारणीभूत नाही, जर शेतकऱ्यांच्या समस्या आणि प्रश्नांना सरकारने वेळीच लक्ष घालुन सोडविले असते तर त्यांचे हाल झाले नसते. कारण मागच्या झालेल्या जिल्हा नियोजनाच्या मंडळाच्या बैटकीत सर्व लोकप्रतिनिधीनी मिळुन याविषयी मागणी केली होती. परंतु सरकारने त्याची दखल घेतली नाही. त्याला खरे जबाबदार राज्य सरकारच असल्याचा घणाघात भाजपाच्या खासदार रक्षा खडसे यांनी केला आहे. जळगाव येथील जिल्हाधिकारी कार्यलयात आयोजित दिशा बैटकीत त्या बोलत होत्या.
याप्रसंगी खासदार उन्मेष पाटील, आमदार शिरीष चौधरी, आमदार चिमणराव पाटील, आमदार सुरेश भोळे उपस्थित होते.
तीन महिन्यानंरत झालेल्या बैटकीत खा. रक्षा खडसे म्हणाल्या की, केंद्र सरकारच्या असलेल्या विविध योजनांचा आढावा या दिशा बैठकीत घेतला जातो. पुढच्या बैठकीत अधिकाऱ्यांनी याचे महत्व जाणून घेऊन योजना लाभार्थ्यापर्यंत पोहचल्या की नाही याची जाणिव करुन घ्यावी, असे त्या म्हणाल्या या बैठकीत विविध 27 प्रश्नावर चर्चा करण्यात आली. या पुढे जर अधिकाऱ्यांनी व्यवस्थ्ति उत्तरे दिली नाही तर आमदार त्यांचा गांधीगीरी पध्दतीने समाचार घेतील असा इशाराही खा. रक्षा खडसे यांनी दिला आहे. विविध योजनांची कामे कंत्रादार निविदा अटीनुसार करीत नसेल आणि अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करत असतील तर त्याच्या विरुद्ध कारवाई करण्यात यावी असे ओदश ही रक्षा खडसे यांनी दिले आहे.
तसेच जे अधिकारी केंद्र सरकारच्या योजनांकडे दुर्लक्ष करत असतील त्यांच्यावर देखील कारवाई करण्याची सुचना खासदार उन्मेष पाटील यांनी दिली आहे. या महत्व पुर्ण बैठकीत मनपा आयुक्त सतिश कुलकर्णी यांनी सांगितले की अमृत योजनेचे काम साधारण डिसेंबर पर्यंत होण्याचे आश्वासन दिले आहे.