जळगाव राजमृद्रा वृत्तसेवा । राज्यात सुरू असलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक निकालांवर आपली प्रतिकीया व्यक्त करतांना जळगाव जिल्हयाचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील म्हणाले की, जिल्हा परिषद निवडणूकीत निकालांचा साधारण प्राथमिक कल हा महाविकास आघाडीच्या पारड्यात असल्याचे दिसुन येत आहे. असे सांगितले तसेच अध्याप परिस्थिती सांगता येत नाही. काही ठिकाणी महाविकास आघाडी तर काही ठिकाणी भाजप असे चित्र सध्या सुरु आहे. परंतु अंतिम निकाला पर्यंत त्यात बदल होउन महाविकास आघाडीचा पारडा जड असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणुकिची पुर्वतयारी आणि रंगीत तालीम म्हणून मिनी मंत्रालय अशी ओळख असलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक निकालांकडे पाहिले जाते सर्व राजकीय पक्षाचे लक्ष्ा याकडे लागुन आहे.