जळगाव राजमृद्रा वृत्तसेवा । राष्टवादी नेते माजी मंत्री एकनाथराव खडसे यांना देण्यात आलेल्या अपंगत्वाच्या दाखल्याची सखोल चौकशी करावी अशी मागणी शिवसेनेचे माजी महानगरप्रमुख गजानन मालपूरे यांनी जिल्हाधिकारी अभिजीत राउत यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे. तसेच यासंदर्भात त्यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अधिष्ठाता यांचेकडे माहिती अधिकारात माहिती मागविली आहे.
राष्टवादीचे नेते माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्याकडे अपंगत्वाचा दाखला आला कुठून ? असा प्रश्न उपस्थित करून माजी मंत्री गिरीष महाजन यांनी चक्क खडसेंच्या अपंगत्वाचा दाखलाच प्रसारमाध्यमांसमोर दाखविला होतो. आता या प्रकरणात शिवसेनेचे गजानन मालपूरे यांनी अधिक माहिती घेण्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अधिष्ठाता यांच्याकडे माहिती अधिकारात अर्ज केला आहे. तसेच जिल्हाधिकाऱ्यांनाही याबाबत निवेदन दिले आहे. या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, एकनाथराव खडसे हे राज्यातील वजनदार नेते आहे. त्यांनी दि. 12 ऑगस्ट रोजी अपंगत्वाचे वैद्यकीय प्रमाणपत्र मिळण्यासाठी अर्ज केला होता. त्यानुसार त्यांना दि.6 सप्टेंबर रोजी अपंगत्वाचा दाखला देण्यात आला. खडसे हे राजकीय वलय असलेले नेते आहे. त्याना शासकीय खर्चाने संरक्षण दिले जात आहे. दि 6 सप्टेंबरपर्यंत त्यांनी अनेक कार्यक्रमांना उपस्थिती दिली आहे. त्यामुळे त्यांचे प्रमाणपत्र हे संशयाच्या भोवऱ्यात आहे. ईडीची चौकशी टाळण्यासाठी त्यांच्याकडून वारंवार दिशभूल केली जात असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. तरी या प्रमाणपत्राची सखोल चौकशी करून खोटे प्रमाणपत्र दिलेले असल्यास अधिकारी व तज्ञ डॉक्टर यांच्यासह माजी मंत्री खडसेंवर कारवाई करावी अशी मागणी गजानन मालपुरे यांनी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे.