जामनेर राजमुद्रा वृत्तसेवा | नगर परिषदेच्या वतीने आज दि.६ ऑक्टोबर रोजी स्वच्छ सर्वेक्षण २०२२ व माझी वसुंधरा २.० अभियान अंतर्गत सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
सदरील सायकल रॅलीची सकाळी ७ वाजता जामनेर नगरपरिषद समोरील राजमाता जिजाऊ चौकापासून सुरू करण्यात आली होती.बोदवड नाका-शास्त्रीनगर-सोनबर्डी असे ४ किमी अंतराची शहरात रॅली काढण्यात आली. रॅलीचा समारोप सोनबर्डी येथे करण्यात आला.
सायकल रॅलीच्या समारोप प्रसंगी जामनेर नगरपरिषदेच्या वतीने सायकल रॅली सहभागाचे प्रमाणपत्र सर्व सहभागी झालेल्या नागरिकांना देण्यात आले. जामनेर शहरातील नागरिकांनी व सायक्लिस्ट ग्रुपने केलेल्या सहकार्याबद्दल जामनेर नगरपरिषद यांचेकडून आभार मानण्यात याप्रसंगी जामनेर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी चंद्रकांत भोसले, आरोग्य विभाग प्रमुख सुरज पाटील, आरोग्य विभाग सहाय्यक गजानन माळी आदी उपस्थित होते. यावेळी मुख्याधिकारी चंद्रकांत भोसले यांनी सायकलींगचे महत्व सांगितले. सायकलींग गृपमधील निवृत्त वनपाल एस.आर.पाटील, निवृत्त शाखा अभियंता ए.पी.पाटील, निवृत्त पोलीस निरीक्षक थोरात साहेब, संतोष बारी,डॉ. निळकंठ पाटील,पशुवैद्यकीय अधिकारी घोडके,प्रदीप गायके, उमेश पाटील,रितेश पाटील,दिपक महाजन,दिलीप सुर्यवंशी, दर्शन महाजन, विजय पाटील, अमरीश चौधरी, अभय पाटील, डॉ.प्रशांत महाजन आदींची प्रमुख उपस्थिती होती.
माझी वसुंधरा अभियान सायकल रॅलीला नगराध्यक्षासह एका नगरसेवकाचा अपवाद वगळता सर्वच नगरसेवक, कर्मचारी अनुपस्थित; नागरिकात नाराजी
जामनेर नगर परिषद तर्फे स्वच्छ सर्वेक्षण २०२२ व माझी वसुंधरा २.० अभियान अंतर्गत आयोजित सायकल रॅलीला नगराध्यक्षा साधना महाजन यांच्यासह स्वीकृत नगसेवक नाना वाणी यांचा अपवाद वगळता सर्वच नगरसेवक यांनी दांडी मारली त्याच बरोबर राजकीय बाहुबली असणारे अनेक कर्मचारी ही अनुपस्थित होते तर ३ ते ४ वरिष्ठ लिपिक ३ ते ५ स्वच्छता कर्मचारी उपस्थीत होते. पदाधिकारी यांची स्तुत्य उपक्रमाविषयी अशी अनास्था पाहता जामनेर कर नागरिक यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली.