जामनेर राजमुद्रा वृत्तसेवा | येथील वाकी रोडवरील नवकार प्लाझा परिसरातील स्टेट बँकेच्या ग्राहक सेवा केंद्रावर काम करणाऱ्या कर्मचार्यांवर काल सायंकाळी घरी जाणाच्या तयारीत असताना अज्ञात चोरट्यांने हल्ला करून जखमी करत कर्मचाऱ्याच्या ताब्यातील सुमारे ३ लाखाची रक्कम लुटून नेण्याचा प्रयत्न केला.मात्र चोरट्याला न जुमानता कर्मचाऱ्यांने धाडस दाखवत लुटीचा प्रयत्न हाणून पाडला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की वाकी रोडवरील नवकार प्लाझा या परिसरात स्टेट बँकेचे ग्राहक सेवा केंद्र असुन तेथील कर्मचारी खुशाल पाटील काल संध्याकाळी दिवसभराचे व्यवहार आटोपून जमा झालेली तीन लाखाची रक्कम बँगेत टाकुन केंद्र बंद करून घरी जात असताना. याचवेळी बाजूला असलेल्या मथाई नगर मधून एक अज्ञात चोरटा तोंडाला रुमाल बांधून धावत आला व त्याने मोटर सायकल वर बसलेल्या खुशाल पाटील यांच्याजवळील बॅग हिसकावून पलायन करण्याचा प्रयत्न केला. मात्र पाटील यांनी बॅग सोडली नाही. दोघांमध्ये खूप झटापट झाली.चोरट्याने कसल्यातरी शस्त्राने खुशालच्या डोक्यावर वार केला.मात्र खुशालने आरडाओरड केल्याने लोक जमा झाल्याने चोरटा तिथून पळून गेला.याबाबत जामनेर पोलीस स्टेशनला गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पि.एस .आय.किशोर पाटील, निलेश घुगे करीत आहेत.