भुसावळ राजमुद्रा दर्पण |भुसावळ.राधाकृष्ण प्रभात फेरी तफै गुरुवारी अग्रसेन जयंती व मंदीर उघडण्याचा आनंदोत्सव कार्यक्रम प्रसंगी जल्लोष करण्यात आला.
या वेळी सकाळी सहा वाजता शहरातील अष्टभुजा मंदीरापासून प्रभात फेरी काढून भक्तीगीत गात,घोषणा देत प्रभात फेरी काढण्यात आली.पांडूरंग टॉकीज समोरील अग्रसेन चौकात राधेश्याम लोहाटी,प्रेमचंद कोटेचा,अॅड गोकुळ अग्रवाल,संजय अग्रवाल,शितल अग्रवाल यांनी पुजन केले.राधाकृष्ण प्रभात फेरीतील सर्व समाज बांधवांनी मंदीर उघडताच शहरातीत बालाजी मदीर,अष्टभुजा मंदीर,तुळजा भवानी मंदीरात जाऊन भजन व भक्ती गीत गाईले.प्रसंगी जे.बी.कोटेचा,लिलाधर अग्रवाल,जी.आर.ठाकूर,अॅड कल्पना टेमानी,राजेश अग्रवाल,देवा अग्रवाल,श्याम अग्रवाल,अर्जुन पटेल,संजय फालक,राजीव चांडक,मोहन भराडे,दिपक आगीवाल,श्रीकांत लाहोटी, अॅड देवेंद्र शर्मा सह समाज बांधव उपस्थित होते.