मुक्ताईनगर राजमुद्रा दर्पण | गेल्या अनेक दिवसापासून मुक्ताईनगर चे आमदार चंद्रकांत पाटील यांचे तसेच माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचे वाद चव्हाट्यावर आले होते यामुळे जळगाव जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले होते एकमेकावर आरोप-प्रत्यारोप आता फिरा सुरू झाल्याने राज्यभरात याची चर्चा होती. मात्र आता पुन्हा खडसे व पाटील समर्थकांमध्ये जुंपली असल्याचे पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सोशल मीडिया सेलचे जिल्हाध्यक्ष शिवराज पाटील यांना सोशल मीडिया वरून कॉल करून धमकी दिल्याची तक्रार मुक्ताईनगर येथील पोलीस स्थानकात तक्रार नोंदवण्यात आहे.
याबाबत वृत्त असे की, मुक्ताईनगर येथील शिवराज पाटील हे जळगाव जिल्हा राष्ट्रवादी सोशल मीडिया सेलच्या जिल्हाध्यक्ष पदावर कार्यरत आहेत. दि २ ऑक्टोबर रोजी माजी मंत्री जामनेर चे भाजप आमदार गिरीश महाजन यांच्या आयोजित पत्रकार परिषदेच्या लाइव्ह प्रक्षेपण दरम्यान महाजन यांच्या व्हिडिओ खालील पोस्टमध्ये शिवराज पाटील यांनी मुक्ताईनगर चे आमदार आमचे असल्याचा उल्लेख केला म्हणजेच भाजपचे एकूण आमदार एकशे सात झाले का ? असा प्रतिसवाल शिवराज पाटील यांनी त्या लाइव्ह प्रक्षेपण दरम्यान पोस्ट केला होता यावरून त्यांना त्याच पोस्टला प्रतिक्रिया म्हणून थेट धमकी देण्यात आल्याचा गंभीर आरोप केला आहे.
यामुळे खडसे – पाटील गटाचा राजकीय संघर्ष सुरू असताना आता व्यक्तिगत पातळीवर टिक्का-टिपणी सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. या घटनेमुळे दोघांमध्ये राजकीय संघर्ष अधिक वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यापूर्वीच दोन्ही प्रमुख नेते हे महा विकास आघाडीचे घटक असताना भविष्यात खडसे – पाटील वाद महा विकास आघाडीच्या डबघाईला कारणीभूत ठरतो का ?असा सवाल देखील उपस्थित केला जात आहे.
या पोस्टवर शिवराज पाटील यांनी दिलेल्या प्रकाश गोसावी रा.मुक्ताईनगर; मितेश पाटील रा.शेमळदा; आणि अक्षय पाटील रा.वरणगांव याने त्यांच्या मोबाईलवरून शिवराज पाटील यांना कॉल करून धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या विषयी सुमारे ४०ते ५० अनोळखी लोकांनी शिवराज पाटील यांना सतत मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत निंबा पाटील यांचे नाव घेऊन जीवे ठार मारण्याच्या धमक्या देत आहेत. तरी माझे अथवा माझ्या परिवारातील सदस्यांच्या जीवाचे काही एक बरे वाईट झाल्यास वरील व्यक्ती व त्यांचे ४०-५० समर्थक लोक जबाबदार राहतील व त्यांनाच जबाबदार धरण्यात यावे. असे तक्रारीत नमुद करण्यात आले आहे. तसेच वरील लोक हे सतत शिवराज पाटील यांच्या घराकडून मोटर सायकलींवर ट्रिपल सीट बसून येऊन जोर-जोरात होर्न वाजवून शिवराज पाटील यांना घाबरवत असतात असे या तक्रारीत देण्यात आले आहे. या प्रकरणी प्रकाश गोसावी, मितेश पाटील, अक्षय पाटील यांच्या विरुद्ध फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करून आपल्याला पोलीस संरक्षण देण्यात यावे असे शिवराज पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. त्यांनी या आशयाची उपमुख्यमंत्री अजितदादा पवार,गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील, जळगाव जिल्हा पोलिस अधीक्षक यांचेकडे सुद्धा लेखी तक्रार केली आहे. नेमकं राष्ट्रवादीतील वरिष्ठ नेते या सर्व प्रकरणाची काय दखल घेतात याकडे माध्यमांसह राजकीय नेत्यांचे लक्ष लागून आहे.