जळगाव राजमुद्रा दर्पण | गेल्या अनेक दिवसापासून मुक्ताईनगर चे शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील तसेच माजी मंत्री राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे यांच्या मध्ये मोठ्या प्रमाणात राजकीय शीतयुद्ध सुरू आहे यामुळे संपूर्ण जिल्ह्यातील तसेच राज्यातील महा विकास आघाडी मध्ये मन तुटाव झाल्याचे पाहायला मिळत आहे. यामुळे काही महिन्यापूर्वी राष्ट्रवादीत दाखल झालेले एकनाथराव खडसे तसेच शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्यात राजकीय वाद रंगला आहे रंगला आहे. खडसेंच्या अपंगत्वाचे प्रमाणपत्र वर आज चंद्रकांत पाटील यांनी उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे. यामध्ये खडसेंनी उच्चस्तरीय चौकशीला सामोरे जावे असे देशील आव्हान आमदार पाटील यांनी केले आहे. यामुळे खडसे – पाटील वाद आणखी पुन्हा वाढण्याची शक्यता आहे.
माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या अपंगत्वावर मोठा राजकीय वाद रंगला आहे. यापूर्वी माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांनी देखील अक्षेप न नोंदवता अपंगत्वाचे प्रमाणपत्र मिळाले कसे ? असा सवाल उपस्थित केला होता सोशल मीडिया वरून वायरल झालेल्या या प्रमाणपत्राची ची गिरीश महाजन यांनी राज्यभरात राजकीय खळबळ उडवली होती.
एकीकडे सर्वसामान्यांना अपंगत्वाच्या प्रमाणपत्रा साठी वर्षानुवर्ष फिरावे लागते तसेच वेळेत मिळत नसल्याने अनेकांची फरफट होते. मात्र खडसे यांना अपंगत्वाचे प्रमाणपत्र कसे मिळाले असा सवाल देखील सेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला आहे. लोकप्रतिनिधी कोणीही असो जर अशा पद्धतीने प्रमाणपत्र तयार होत असेल तर चौकशीला सामोरे जायला हवं, या मताचा मी आहे. नाथा भाऊंना देखील असेच वाटत असेल असे वक्तव्य सेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी मिश्किली टीका देऊन केले आहे.
माजी मंत्री गिरीश महाजन यांनी गेल्या दोन दिवसापूर्वी पत्रकार परिषदेत आमचे मुक्ताईनगर चे आमदार चंद्रकांत पाटील असा उल्लेख केला होता याबाबत आमदार पाटील यांना प्रश्न विचारला असता त्यांनी प्रथम पत्रकारांना प्रतिसवाल करीत आमचे पत्रकार बांधव म्हटल्यावर कोणी शिवसेनेचा होईल का ? असे उत्तर आमदार चंद्रकांत पाटील यांनी माध्यम प्रतिनिधींना दिले होते यावेळी उपस्थितां मध्ये एकच हश्या उडाला