जळगाव राजमुद्रा दर्पण | गेल्या दोन दिवसांपूर्वी गिरीश महाजन यांनी खडसे यांना प्रत्युत्तर म्हणून जाहीर पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. खडसेंनी आपल्या आरोपात कन्या रोहिणी खडसे ह्या गिरीश महाजनांमुळे पराभूत झाल्या असा आरोप केला होता. महाजनांनी या आरोपाचे खंडन करताना पत्रकार परिषदे दरम्यान आमचे मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील असा उल्लेख केला होता, यावरून खरंच गिरीश महाजन यांनी तुम्हाला निवडणुकीमध्ये मदत केली का ? असा सवाल चंद्रकांत पाटील यांना विचारला असता त्यांनी हे गिरीश महाजनांना उशिरा सुचले अन्यथा आणखी माझा लीड वाढला असता अशी मिश्किली प्रतिक्रिया खडसेंचे कट्टर राजकीय विरोधक चंद्रकांत पाटील यांनी आज माध्यमांसमोर बोलताना दिली आहे.
गिरीश भाऊंचा प्रभाव असलेल्या भागात मला हजार सुद्धा मते मिळाली नाही त्यांच्या भागातून मी पिछाडीवर होतो, त्यांनी जर खरच मदत केली असती तर माझा लीड आणखी वाढला असता ज्या लीड ने मी विजयी झालो त्याहून अधिक समाधान झाले असल्याचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी राजमुद्राशी बोलताना सांगितले आहे.
माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी गेल्या पाच दिवसापूर्वी एका जाहीर कार्यक्रमात बोलताना मला आताच कळले की, माजी मंत्री गिरीश महाजन यांच्यामुळेच कन्या रोहिनी खडसे यांचा पराभव झाला असे वक्तव्य बोलून खडसे यांनी एकच खळबळ उडवली होती गिरीश महाजन यांच्या मदतीने प्रतिस्पर्धी उमेदवार निवडून आला असा घणाघाती आरोप देखील खडसे यांनी केला होता.