जळगाव राजमुद्रा दर्पण | गेल्या अनेक दिवसापासून जळगाव शहरात अनेक विघातक तसेच फसवणुकीच्या घटना घडत आहे विशेषतः मालमत्ता प्रकरणात अनेकांची फसवणूक होण्याची प्रकरणे चव्हाट्यावर येत आहे यामध्ये वेळीच सावधानता बाळगली नसल्याची कारणे देखील पुढे येत आहे वेडीच कागदोपत्री व्यवहार न केल्याने अनेक जण अडचणीत आल्याचे पाहायला मिळत आहे.
नुकतेच वासू कमल विहार प्रकरण सध्या जोर धरत असून बिल्डर्स तसेच रहिवाशांमध्ये कायदेशीर वाद रंगल्याचे पाहायला मिळत आहे. यामुळे अशी प्रकरण पुन्हा घडू नये यासाठी वेळीच सावधानता बाळगण्याची जळगावकरांना गरज आहे. या प्रकरणात नेमकं बिल्डर्स खरा कि रहिवाशी याबाबत अद्याप तरी चित्र स्पष्ट झालेले नाही. कागदोपत्री झालेल्या खरेदीखता नुसार अनेक बाबी अद्याप स्पष्ट झालेल्या नाही. मात्र बिल्डर्सचे ब्राउचर बघितले असता यामध्ये अनेक सुविधांचा दावा देखील करण्यात आल्याचे समोर येत आहे.
वासू कमल विहार येथील 48 फ्लॅट धारकांनी पत्रकार परिषद घेत काही माहिती माध्यमांवर सादर केले याबाबतच्या काही रेकॉर्डिंग देखील असल्याचा दावा करण्यात आला. खरेदीदार रहिवाशांनी केलेले दावे काही प्रमाणात तरी खरे ठरतात असे दिसून येते, याबाबत बिल्डर्स विरोधात रहिवासी अशी कायदेशीर लढाई वासू कमल विहार प्रकरणात घडताना दिसणार आहे.
याबाबत रहिवाशी असलेल्या एकूण 48 फ्लॅटधारक यांनी रेरा सह जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांच्या कडे निवेदन देऊन तक्रार केली आहे. या तक्रारीत ब्राउचर सह रहिवाशी असलेल्या फ्लॅट धारकांकडे रेरा च्या वेब पोर्टल वर बिल्डर्सने दाखल केलेल्या प्रकरणातील काही पुरावे आहेत, या प्रकरणात नेमकं कायदेशीर लढाईत कोणाला यश येते ? 48 फ्लॅट धारक रहिवाशांनी केलेल्या मागण्या अथवा केलेले दावे बिल्डर्स पूर्ण करणार का ? याबाबत मात्र संभ्रम कायम आहे.
बांधकाम व्यावसायिक शिरीष काबरा यांनी आपल्या प्रतिक्रियेत आपली बाजू मांडताना या इमारतीला ते सातव्या मजल्यावर जीम प्रस्तावित होती मात्र रहिवाशांनी जीम खालच्या मजल्यावर असावे अशी मागणी केली त्यानंतर ही जीम खालच्या मजल्यावर करण्याचे ठरले या जागेत जीम होणार होती. ते फ्लॅट बांधकाम व्यावसायिकांचे आहे. मात्र त्यासाठी तेथे सर्व रहिवाशांचे परवानगी लागणार आहे. त्यांनी त्यांच्या एमओयुवर अद्याप सही केलेली नाही तसेच बगीचा आणि जॉगिंग ट्रॅकची जागाही महापालिकेच्या मालकीचे आहे. ही जागा सीएसआर अंतर्गत विकसित करण्याचे ठरले त्यानुसार ते कामही सुरू केले होते हे काम रहिवाशांनी बंद पडल्याचा आरोप काबरा यांनी केला आहे. फ्लॅट धारकांसाठी वासुकमल विहार फ्लॅट ओनर्स असोसिएशन ही रजिस्टर संस्था आहे. त्या संस्थेत रहिवाशांचे मेंटेनन्स साठीचे 85 लाख रुपये जमा आहेत. मात्र नंतर वासुकमल विहार सोसायटी स्थापन करण्यात आली. डॉक्टर यशवंत पाटील हे त्याचे अध्यक्ष आहेत ही नोंदणीकृत संस्था नाही, या पैशांमुळे सर्व वाद उद्भवला असल्याचे काबरा यांनी सांगितले आहे. मात्र हा पैसा रहिवाशांचा आहे असेही काबरा यांनी स्पष्ट केले आहे. तसेच नोटीसही फक्त नोंदणी नसलेल्या संस्थेचे सभासद असलेल्यांनाच देण्यात आल्याचे स्पष्ट त्यांनी यावेळी केले