(राजेंद्र शर्मा)
जळगाव राजमुद्रा दर्पण । खान्देशच्या रंगभूमीत अनेक कलावंत होऊन गेले परंतु सध्या लेवा बोली भाषेत अभिनयाचे कार्य सुरू आहे. जळगावच्या नाट्यक्षेत्रातील कलावंत हेमंत पाटील हा राज्यात गाजतोय. रंगभूमी वरील उगवता तारा प्रख्यात हास्यजत्रा चे निर्माता आणि लेखक दिग्दर्शक सचिन ओके आणि गुरु सचिन गोस्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली हेमंत पाटील यांचे अविरत कार्य सुरू आहे. यामुळे खान्देशातील कलावंताना बहुमान वाटावा अशी ओळख नाट्यकलावंत हेमंत पाटील यांनी तयार केली आहे.
जळगाव येथील के सी ई सोसायटीचे मुळजी जेठा महाविद्यालयात गेल्या सात वर्षापासून प्राध्यापक म्हणून तसेच नाट्यशास्त्र विभागात विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहे. विशेष म्हणजे गेल्या पंधरा वीस वर्षापासून हेमंत पाटील हे राज्यातील नाट्यक्षेत्रात सक्रिय आहे.
नाट्यशास्त्र विषयात जळगावच्या कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात पदवी आणि छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ, कोल्हापूर येथे पदविका घेतली तसेच फिल्म अंड टेलिव्हिजनचा दिग्दर्शनाचा अभ्यासक्रम पूर्ण केलेला आहे.
आज पर्यंत हौशी रंगभूमीवर 23 नाटक वेगवेगळ्या राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये 21 एकांकिका आणि व्यवसायिक नाटक केले आहे. यामध्ये महाराष्ट्र सांस्कृतिक कृती कार्य संचालनालय आयोजित मराठी आणि हिंदी राज्य नाट्य स्पर्धेत सहा रौप्य पदक आणि वेगवेगळ्या एकांकिका स्पर्धेत सात वेळा वाचिक अभिनयातील पारितोषिक प्राप्त करणारा खान्देशातील एकमेव कलाकार म्हणजे हेमंत पाटील होय.
सद्या लेवा बोली भाषेत त्याचे अभिनयाचे कार्य सुरू झाले आहे. यामुळे खान्देशाच्या मातीतला सुगंध राज्यातील नाट्य क्षेत्रात दरवळत आहे. महाराष्ट्रात लोकप्रिय असलेल्या महाराष्ट्राच्या हास्य जत्रा या सोनी मराठी वाहिनीवरील कार्यक्रमात आपल्या खान्देशातील लेवा पाटील बोली भाषेचा वापर करून स्क्रिट विडंबन सध्या हेमंत करीत आहे. या सर्वात हास्य गुरु सचिन गोस्वामी आणि सचिन मोठे या दिग्गज महानुभावांच्या मार्गदर्शनाखाली काम सुरू केले आहे.
यामध्ये विशाखा सुभेदार, समीर चौगुले, प्रसाद खांडेकर, अरुण कदम, प्रभाकर मोरे, ओमकार राऊत, ऋतिक प्रताप यांच्या सोबत हास्य जत्रा या कार्यक्रमात आपले अभियानचे उत्तम सादरीकरण करीत आहे. खान्देशात ही भाषा प्रकर्षाने बोलली जाते, या भाषेतील असणारा गोडवा आणि त्यातून खानदेशातल्या भाषांना उंची देण्याच्या आणि ही भाषा जगभर प्रसिद्ध होण्याच्या मानस डोळ्यापुढे ठेवून त्यांचे कार्य सुरू आहे. तसेच या आधी हेमंत झी. टीव्हीवरील चला हवा येऊ द्या.. होऊ दे .. व्हायरल यामध्ये महाराष्ट्रातून निवड होऊन लेवा बोली भाषेतून विडंबन साजरीकरण केले आहे. यासाठी त्यांना गुरु हेमंत कुळकर्णी, खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्रज्ञावंत नंदकुमार बेंडाळे, प्राचार्य प्रा. एस. एन भारंबे, माजी प्राचार्य डॉक्टर उदय कुलकर्णी आणि गुरुवर्य प्राचार्य अनिल राव, शशिकांत वडोदकर यांचे सहकार्य आणि मार्गदर्शन त्यांना लाभले आहे.
हा त्याच्या प्रवास सुरूच राहणार असून खान्देशातील नवोदित कलावंतांसाठी त्याचे अभिनय व नाट्य क्षेत्रातील कामगिरी हि उल्ल्लेखनीय बाब ठरणार आहे.