जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा । जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी बँकेतील सभागृहात कार्यालय सुरु करण्यात आले आहे. बँकेची वाहने आणि विश्राम गृह सहकार विभागाकडून अधिग्रहित करण्यात आले आहे. दरम्यान, जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या हालचाली गतिमान झाल्या असून यंदा देखील सर्व पक्षीय पॅनलचा फंडा वापरण्याचा प्रयत्न केला जात आहे. यासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील व आमदार चिमणराव पाटील यांनी पुढाकार घेत सर्व पक्षीय पदाधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या आठ जणांची कोअर कमेटी तयार केली आहे. तिची मात्र २ बैठका झाल्या आहेत. त्या बैठकी नंतर भाजप माजी मंत्री आ.गिरीश महाजन आणि राष्ट्रवादीचे नेते यांच्यात व्यक्तिगत आरोप प्रत्यारोपाच्या फेरी सुरु झाल्या आहे. त्यामुळे या सर्व पक्षीय पॅनल बाबत अनिश्चितता पसरली आहे. तसेच या निवडणूक मैदानात जनहित जागृत मंचने ही मैदानात उडी घेतल्याने निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता धूसर झाली आहे.
मात्र या निवडणुकीत आता भाजप वेगळी चूल मांडण्याच्या पर्यटन असून भाजपच्या वतीने स्वतंत्र पॅनलची चाचपणी सुरु आहे. आमदार गिरीश महाजन यांनी काही पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन या बाबत राजकीय खेळी सुरु केली आहे. त्यामुळे बँक निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा राजकीय सामना रंगण्याची चिन्ह दिसून येत आहे. गेल्या वेळी तत्कालीन पालकमंत्री असताना एकनाथ खडसेंनी सर्व पक्षीय पॅनल साठी पुढाकार घेऊन निवडणूक लढवली त्यात सर्व पक्षांना न्याय देण्यात येऊन अध्यक्ष पद भाजपकडे रोहिणी खडसे यांच्या रूपाने राहिले तर आमदार किशोर पाटील यांच्याकडे उपाध्यक्ष पद दिले आता या निवडणुकीत सर्व पक्षीय पॅनल होते का ? या संदर्भात राजकीय पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता लागून आहे.
असा आहे निवडणूक कार्यक्रम ?
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या २१ जागेंसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्या नंतर साधारण दिवाळी नंतर निवडणुकीचा धमाका उडणार आहे. ११ तारखे पासून नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास सुरुवात होत आहे, २१ नोव्हेंबरला मतदान होणार आहे. तसेच १८ पर्यत अर्ज दाखल करता येणार आहे. २० तारखेला छाननी होणार आहे. २१ ते ८ नोव्हेंबर पर्यत माघारीची मुदत राहणार आहे. त्या नंतर अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. २१ नोव्हेंबरला मतदान आणि २२ रोजी मत मोजणी होणार आहे.