जळगाव राजमुद्रा दर्पण | राष्ट्रवादीचे दिग्गज नेते एकनाथ खडसे ते सध्या दिव्यांगाच्या प्रमाणपत्र मुळे चर्चेत आहेत. माझे मंत्री भाजपा नेते गिरीश महाजन यांनी यासंदर्भात आक्षेप नोंदवल्या नंतर इतर अनेक जण पुढे आले होते. जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या दिव्यांग मंडळाने त्यांना 60% अपंगत्वाचे प्रमाणपत्र दिले असून वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता अधिष्ठाता व अपंग मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर मारुती पोटे यांनी हे प्रमाणपत्र वैद्यकीय तपासणीच्या आधारे खडसेंना अपंगत्वाचे तात्पुरते प्रमाणपत्र दिल्याचा दावा केला आहे.
दिव्यांगात्वाचा प्रमाणपत्राची सर्व प्रक्रिया ऑनलाईन असून तपासणीसाठी खडसे स्वतः जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात असल्याचे त्यांनी सांगितले वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले असताना माजी मंत्री गिरीश महाजन यांनी सर्वात आधी एकनाथ खडसे यांच्या अपंगत्वाचे प्रमाणपत्र माध्यमांसमोर आणून आक्षेप नोंदविला होता.
खडसे यांचेत्यांचे राजकीय प्रतिस्पर्धी असलेले शिवसेनेचे मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील , माजी महानगरप्रमुख गजानन मालपुरे यांनीही खडसेंच्या अपंगत्वाच्या प्रमाणपत्राची वर आक्षेप घेतला आहे. मालपुरे यांनी जिल्हा वैद्यकीय रुग्णालय व महाविद्यालयातील सीसीटीव्ही फुटेज द्यावे अशी देखील मागणी केली आहे. खडसे यांच्या दिव्यांग प्रमाणपत्र मागे काहीजण ईडीच्या चौकशी चा देखील संबंध जोडत आहे.
चौकशी पासून बचावासाठी त्यांनी हे केल्याचे बोलले जात आहे. दरम्यान शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकनाथ खडसे यांच्या सर्व विविध वैद्यकीय तपासण्या त्यांचा अहवालाच्या आधारे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील दिव्यांग मंडळाचे तज्ञ यांनी अपंगत्वाचे प्रमाणपत्र दिल्यास त्याचे डॉक्टर पोटे यांनी सांगितले आहे.