जळगाव राजमुद्रा दर्पण | तीन महिन्यापूर्वी भाजप सोडून शिवसेनेचे शिवबंधन बांधले तीन नगरसेवक तीन महिन्यातच भाजपमध्ये परवाची केल्याची घटना माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत आणली आहे बंडखोर नगरसेवकांना यामुळे मोठा धक्का लागला आहे माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत या तीन नगरसेवकांनी घरवापसी केल्याने भाजपाच्या आशा-आकांक्षा अधिक पल्लवित झाल्याचे दिसून आले. यानंतर मात्र बंडखोर तसेच भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी दावे-प्रतिदावे केले आहेत भाजपने आणखी काही नगरसेवक आमच्या संपर्कात असल्याचा दावा केला आहे तर तर बंडखोरांनी आणखी आठ नगरसेवक आमच्या संपर्कात असल्याचा दावा केला आहे. यामुळे नेमकं काय खरं.. आणि काय खोटं ..? याबाबत मात्र राजकीय तर्क – वितर्क लढवले जात आहे.
तीन महिन्यापूर्वीच शिवसेनेत दाखल झालेले नगरसेवक पुन्हा भाजपमध्ये दाखल झाले असता यामध्ये सुरेश सोनवणे, शोभा बारी, हसीना बी शेख यांचा समावेश आहे.
भाजपने काही नगरसेवक आमच्या संपर्कात असल्याचा दावा केला आहे. याबाबत अधिकृत सूत्रांकडून देखील माहिती समोर आली आहे. काही नगरसेवकां सोबत शहरातील एका प्रशस्त हॉटेलमध्ये या संदर्भातल्या बैठका झाल्या असल्याचे एका भाजपच्या उच्च पदाधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटी वर सांगितले आहे.
बंडखोर तसेच भाजपमध्ये मोठी राजकीय स्पर्धा रंगली आहे. यासोबतच एकमेकाची कायदेशीर कोडी देखील दोघे समूह करतांना दिसून येत आहे. बंडखोरांच्या माध्यमातून पाठपुरावा करत प्रभाग समिती निवडणुकी दरम्यान भाजपा नगरसेवकांना बंडखोर गटातील गटनेते दिलीप पोकळे व प्रतोद उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्या अर्जावर सुनावणी करताना विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी भाजपा नगरसेवकांना उल्लंघन केले म्हणून नोटीस बजावली आहे. नेमका त्या दिवशी भाजपा नगरसेवकांना ही नोटीस बजावण्यात आली त्याच दिवशी बंडखोरां मधील मधील तीन नगरसेवकांनी पुन्हा भाजपामध्ये घरवापसी केल्याने भाजपने देखील धक्कातंत्र वापरला आहे.