मुंबई राजमुद्रा दर्पण । संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना बंद मोडीत काढण्याची भाषा करणाऱ्यांवर जोरदार हल्ला चढवला. राज्यातील बंद शंभर टक्के यशस्वी झाला आहे. या शेतकऱ्यांचं आपण देणं लागतो, त्यामुळेच हा बंद आहे. पण बंदला पाठिंबा नाही, बंद मोडून काढू अशी भाषा करणारे मूर्ख आहेत, अशी टीका करतानाच बंद मोडून काढण्याचा इशारा देणाऱ्यांनी रस्त्यावर उतरून दाखवावंच, असा इशारा शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिला आहे.
या देशातील शेतकऱ्यांचे देण लागतो का? हा प्रश्न स्वत:ला विचारावा. कोणी हा बंद मोडून काढू असं म्हणत असेल तर ते मूर्ख आहेत. कोणाला वाटत असेल तर आम्ही रस्त्यावर उतरू तर त्यांनी येऊन दाखवावं. लखीमपूर खेरीत मंत्रीपुत्राने त्याच्या थार गाडीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना चिरडण्याचा प्रयत्न केला अशी कुणाकडे एखादी जीपगाडी असेल तर त्यांनी रस्त्यावर आणावी, विरोधाचे कीडे वळवळत असतात. हा राजकीय बंद नाही. शेतकऱ्यांसाठी बंद आहे. शेतकऱ्यांनी अन्न पिकवलं नाही तर हे गाड्या रस्त्यावर काढा म्हणतात ते उपाशी मरतील. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी आपण एक दिवस बंद पुकारणार नसू तर जय जवान जय किसान या घोषणेला काहीच अर्थ नाही, असंही ते म्हणाले.
देशातील शेतकरी बंदकडे पाहत आहे. देशातील शेतकऱ्यांची लढाई महाराष्ट्र लढत आहे. दीड वर्षापासून शेतकरी आंदोलन करत आहेत. हे आंदोलन करताना 400 पेक्षा अधिक शेतकरी मरण पावले आहेत. हरयाणात भाजपच्या राज्यात काही शेतकऱ्यांचे डोके फोडले आहे. उत्तर प्रदेशात शेतकऱ्यांना चिरडून मारले आहे. शेतकरी आपल्याकडे मोठ्या अपेक्षेने पाहात आहे. म्हणून महाराष्ट्राने बंद पुकारला आहे. बंद सुरू आहे. बंद शंभर टक्के यशस्वी आहे, असं त्यांनी सांगितलं.