धरणगाव राजमुद्रा दर्पण । पशुधनावर लंपी स्किन डिसीज या विषाणूजन्य साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव व या रोगाच्या साथीवर नियंत्रण मिळवण्यासाठी तसेच या रोगाबाबत जनजागृती करण्यासाठी धरणगाव तालुक्यातील लाडली येथे गुरुवारी लसीकरण व जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
जिल्हा परिषद सदस्य प्रताप गुलाबराव पाटील यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. जिप सदस्य प्रताप पाटील यांनी डॉक्टरांना सूचना दिल्या की ज्या ठिकाणी हा संसर्गजन्य रोग असून प्रत्येक शेतकऱ्याचा गोठा फवारणी करून तसेच लसीकरण जास्तीत जास्त प्रमाणात करावे.
धरणगाव तालुक्यात 14000 लसींची मागणी करण्यात आली आहे यापैकी 5000 लसींचा पुरवठा झालेला असून उर्वरित लसीचा पुरवठा येत्या आठवड्याभरात होणार आहे असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य प्रताप गुलाबरावजी पाटील यांनी केले.
यावेळी या उपस्थित सरपंच गजानन पाटील माजी सरपंच राजेंद्र पाटील, पोलीस पाटील, जगन्नाथ पाटील, रविन जिभाऊ प्रगतशील शेतकरी आदी उपस्थित होते. या शिबिरामध्ये प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून पशु पालकांमध्ये जनजागृती करण्यात आली यावेळी पशु वैद्यकीय अधिकारी डॉक्टर भालेराव आणि डॉ नारखेडे यांनी या साथीच्या रोगाबद्दल प्रतिबंधक उपाय योजनेबद्दल गावातील पशुपालकांना मार्गदर्शन केले.