जामनेर राजमुद्रा दर्पण । येथील जैन सोशल ग्रुप, भारतीय जैन संघटना, भारतीय जैन अल्पसंख्याक महासंघ, युथ एज्युकेशन महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने जामनेर येथे सवर्ण आरक्षण योजना, अल्पसंख्याक छात्रव्रुती योजना व प्रधानमंत्री स्वयंरोजगार मुद्रा ऋण योजनांची माहिती यावर शिबिराचे आयोजन करण्यात आले. ह्या साठी स्टेट बँकेचे शाखा प्रंबधक आशुतोष कुमार, मयूर पोरवल, एच.डि.एफ.सी. बँकेचे शाखा प्रबंधक रुपेश नाईक, उपस्थित होते.
युथ एज्युकेशनचे अध्यक्ष नितीन सुराणा यांनी सरकार तर्फे विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या सवर्ण आरक्षण योजना इ.डब्ल्यू.एस व अल्पसंख्यांक शिष्यवृत्तीची माहिती दिली व पाल्यांनी व विद्यार्थ्यांनी अशा योजनांचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा असे आवाहन केले. यावेळी सनी डांगी, सुमित मुनोत, प्रफुल्ल लुंकड,निलेश भुरट, विजेंद्र सैतवाल आदीं उपस्थित होते.