जळगाव राजमुद्रा दर्पण । महाराष्ट्र बंदला जळगाव शहरातून संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. शहर बंद करण्यासाठी आज सकाळी शहरातील शास्त्री टॉवर चौकात महाविकास आघाडीचे सर्व नेते कार्यकर्ते एकत्र जमले होते. या नेत्यांनी आवाहन केल्यानुसार व्यापार्यांनी आपले व्यवहार बंद केले होते. परंतु काही कालावधीनंतर दुकाने आणि व्यापारी संकुल सुरू करण्यात आली. महाराष्ट्र विकास आघाडीचे नेते व कार्यकर्त्यांनी यावेळी विविध घोषणा दिल्या ठिक-ठिकाणी फिरून त्यांनी बंदचे आवाहन केले.अनेक ठिकाणी दुकाने सुरू असल्याचे दिसून आले. शहरातील शास्त्री टॉवर , नवी पेठ, दाणा बाजार, स्टेडियम, नेहरू चौक, सुभाष चौक,सराफ बाजार, सिंधी कॉलनी, स्वातंत्र्य चौक, नवीन बस स्थानक, रेल्वे स्टेशन आदी परिसरातील व्यापारी संकुलं बंद होती. तर काही भागात पुन्हा दुकाने सुरु करण्यात आलीचे दिसून आले. मात्र काही ठिकाणी दुपारनंतर दुकाने मार्केट पूर्ववत सुरू झाली. दाना बाजारात होणारी कोट्यावधी रुपयांची उलाढाल ठप्प झाली होत. तसेच सराफ बाजारात दैनंदिन मोठ्या प्रमाणात कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असते. परंतु या बंदमुळे त्यावर परिणाम झाला आहे, सकाळी आवाहन केल्यामुळे काही काळ सर्वत्र बंद जाणवले. यावेळी महविकास आघाडीचे, व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार, प्रदेश उपाध्यक्ष आमदार शिरीष चौधरी, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विष्णु भंगाळे, शाम तायडे, मनोज सोनवणे, जगदीश गाढे, संदीप पाटील, वाल्मीक पाटील, राष्ट्रवादिचे जिल्हाध्यक्षरवींद्र पाटील, विनोद कोळपकर, माजी खासदार उल्हास पाटील, अशोक लाडवंजारी, तसेच काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी पक्षातील महिला पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते .