भुसावळ राजमृद्रा दर्पण | भुसावळ राज्यातील महाविकास आघाडीने बंद पुकारला असतांना तालुक्यातील वरणगाव येथे मात्र गालबोट लागल्याचे वृत्त आहे. भारतीलय जनता पार्टी आणि महाविकास आघाडीचे पदाधिकारी आमने सामने आल्याने दोघांमध्ये काही काळ तणाव निर्माण झाला.
माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांच्यासह इतरांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
प्राप्त माहिती नुसार, भुसावळ तालुक्यातील वरणगाव शहरामध्ये महा विकास आघाडीने पुकारलेल्या आजच्या बंदला गालबोट लागले आहे महा विकास आघाडी व भाजपचे कार्यकर्ते आमने सामने आले, भाजप कार्यकर्त्यांमध्ये मारामारी झाली आणि दोन्ही पक्षाचे काही कार्यकर्ते हॉस्पिटलमध्ये दाखल आहे, भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथे विकास आघाडीच्या वतीने आज बंद पुकारण्यात आला होता या बंदला महा विकास आघाडीचे कार्यकर्ते शांततेत पाळण्याचे आवाहन करत असतांना भारतीय जनता पार्टीचे माजी नगराध्यक्ष्ा सुनील काळे बंद पाळू नका असे आवाहन करत होते, दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते समोरासमोर आल्याने राडा झाला व हाणामारी झाली त्यामुळे दोन्ही पक्षोचे कार्यकर्ते आता हॉस्पिटलमध्ये आहे.
या संदर्भात दोन्ही बाजूंनी एकमेकांवर आरोप केले आहे. राष्टवादीचे जिल्हा उपाध्यक्ष्ा तथा गटनेते राजेंद्र चौधरी यांनी आपल्या कार्यकर्त्यांनी सुनील काळे यांना मारहाण केली नसून हा आगामी निवडणुकीसाठी स्टंट असल्याचा आरोप केला आहे. शिवसेनेचे पदाधिकारी नितीन देशमुख् यांनी देखील अशा प्रकारचा हल्ला झाला नसुन हा केवळ बोलचालीचा प्रकार घडला आहे. या प्रकारामुळे दीपक मराठे यांचा रक्तदाब वाढला असून महेश् सोनवणे यांची सोन्याची चेन गायब झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
दरम्यान, भाजपचे पदाधिकारी गजानन वंजारी यांनी सुनील काळे यांच्यावर सुमारे 100 जणांचा जमाव चाल करुन आल्याचा आरोप केला आहे. यातील राष्ट्रवादीच्या सुमारे 35 जणांनी त्यांच्यावर हल्ला चढविल्याने ते जखमी झाल्याचा आरोप केला आहे, तर भाजपचे शहराध्यक्ष सुनील माळी यांनी जमावाने सुनील काळे, डॉ. साजीद आणि श्ंकर पवार यांना बेदम मारहाण केल्याचा आरोप केला. हा नियोजीत प्लॅन असल्याचा आरोप त्यानी केला.