जामनेर राजमुद्रा दर्पण | लखीमपुर घटनेचा निषेध म्हणून महाविकास आघाडी कडुन ११ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र बंदचे आवाहन करण्यात आले होते.पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला जामनेर करांनी संमिश्र प्रतिसाद देत.सकाळी अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण बाजारपेठ व दुकाने बंद ठेवुन बंदला संमिश्र प्रतिसाद देत दुपारी बारा वाजेनंतर आपापली दुकाने उघडण्यास सुरूवात केली.कोरोनाच्या महामारीमुळे सगळीकडे अर्थ व्यवस्था कोलमडून सर्व सामान्यांचे कबंरडे मोडुन पडले होते. आताशी कुठे जिवनमान सुरळीत होण्याच्या मार्गावर आहे.म्हणून आम्हाला मनापासून इच्छा नसतानाही उदरनिर्वाहापोटी काही वेळ दुकाने बंद ठेवून उघडण्याची आवश्यकता असल्याचे मत काही दुकानदारांनी व्यक्त केले.यावेळी महाविकास आघाडीतील संजय गरुड, वंदना चौधरी, डिंगबर पाटील,व्हि.पी.पाटील,विलास राजपुत, किशोर पाटील, डॉ.प्रशांत पाटील,एस.टी.पाटील,शंकर राजपुत, विश्वजित पाटील,प्रदीप गायके,मनोज महाले,राजु नाईक,प्रल्हाद बोरसे,संदीप हिवाळे,अतुल सोनवणे,जितेश पाटील,दिपक माळी आदींसह महाविकास आघाडीतील पदाधिकारी व कार्यकर्ते बंदच्या आवाहनात सामील झाले होते.