जळगाव राजमुद्रा दर्पण । भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश विभागाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त पर्यावरण रक्षक पंधरवाड्याचे आयोजन करण्यात आले आहे. भाजप जळगाव जिल्हा व महानगरातर्फ पर्यावरण विषयी संगम, वाटिका, पर्यावरण चित्रकला, झाडासोबत सेल्फी अशा विविध स्पर्धा आयोजित करण्यात आले आहे.
या स्पर्धत पर्यावरण या विषयावर लहान गट इयत्ता ५ वी ते ८ वी, मोठा गट ९ वी ते १२ वी या गटातील विद्यार्थ्यांनी चित्रकला स्पर्ध सहभागी होता येणार आहे. या स्पर्धत लहान गट व मोठ्या गटासाठी प्रथम पारितोषिक २००० रुपये, प्रोत्साहनपर पारितोषिक प्रत्येकी ४ विद्यार्थीसाठी ११०० रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे. उत्तेजनार्थ पाच विद्यार्थ्यांना ५०० रुपये बक्षीस देण्यात येणार आहे.
स्पर्धत सहभागी विद्यार्थ्यांना राज्याचे माजी मुख्यमंत्री विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यातर्फे गौरव प्रमाणपत्र जिल्हाअध्यक्ष आमदार सुरेश भोळे, जळगाव महानगर जिल्हा अध्यक्ष दिपक सूर्यवंशी यांच्या हस्ते देण्यात येणार आहे. स्पर्धत कार्यक्रमाचे संयोजक प्रदेश उपाध्यक्ष ॲड. माधवी नाईक, सहसंयोजक प्रवीण अलई, उत्तर महाराष्ट्र प्रमुख भाऊसाहेब वाकचोर यांनी केले आहे.
स्पर्धत सहभाग घेणाऱ्या स्पर्धकांनी https://forms.gle/FHivTUnoTwtQDLmx8 या लिंक वर जाऊन गुगल फार्म भरावा. तसेच चित्रकला स्पर्धत सहभाग घेणाऱ्या स्पर्धकांनी आपण रंगवलेले चित्रे दिनांक २० आक्टोंबर२०२१ पर्यंत भाजप कार्यालय वसंत स्मृती बळीराम पेठ, जळगाव येथे सकाळी १० ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत जिल्हा कार्यालय मंत्री प्रकाश पंडित व गणेश माळी यांच्याकडे जमा करावेत.