जळगाव राजमृद्रा दर्पण । जळगाव येथील कवियित्री बहिनाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात अनेक दिवसांपासून गैरव्यवहार आणि इतर प्रकरणे पडून आहे. यांची चौकशी होउन संमधितांवर गुन्हे दाखल व्हावे अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी कॉग्रेसचे ॲड कुणाल पवार, भूषन भदाणे, गणेश निबांळकर, गौरव वाणी, चेतन चौधरी यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिह कोशारी यांच्याकडे केली आहे.
याबाबत राज्यपालाना पाठविलेल्या निवेदणात राष्ट्रवादी विदयार्थ्यी काँग्रेसने म्हटले आहे की, यासंदर्भात वेळोवेळी तक्रार अर्ज दिले आहे. परंतू काही लोक अधिकाऱ्यांना हाताशी धरून संगन मताने विद्यापीठात गैर व्यवहार करीत आहे. त्यामुळे विदयापीठाची बदणामी होत आहे. तसेच विदयापीठात कर्मचाऱ्यांचे गणवेश, साफ साफाई, ठेके,रद्दी यासाठी निविदा न काढता फायद्यासाठी करण्यात आले आहे. तसेच सुरक्षा रक्षकांच्या निधी भत्ते, कपडे आणि सूट आणि दिले जाणरे वेतन आदी कोट्यवधी रूपयांचे संगम मत करून अडकवून ठेवण्यात आले आहे.विद्यापीठ अंतर्गत येणाऱ्या काही महाविद्यालयांची ओळख पाहून नियम बाह्य प्राध्यापक भरती व गुणवंता नसतांना दिलेली भरती या प्रकरणांची देखील चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे. तसेच विद्यापीठात कायम स्वरुपी नेमणूक करण्यासाठी केलेली कर्तव्यात कसूर तसेच विद्यापीठ परिसरात प्राध्यापक भटकर यांनी विद्यार्थ्यांसोबत केलेले संभाषण आदी प्रकरणांची चौकशी देखील झाली नाही. तरी शासनाने या सर्व प्रकराणांची आणि गैर व्यवहारांची सखोल चौकशी करून संधितांवर गुन्हे दाखल करावे अशी मागणी राज्यपालांना करण्यात आली आहे.