जळगाव राजमुद्रा दर्पन । जिल्हा बँक निवडणुकीत उमेदवारी करण्या संदर्भात सर्वपक्षीय पॅनल प्रमुख व जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील हेच निर्णय घेतील, जळगाव जागृत मंच च्या वतीने उमेदवारी करण्याचा प्रश्नच येत नाही. मी तेव्हा पण शिवसेनतेच होतो आणि आजही आहे. अशी प्रतिक्रिया मनपाचे विरोधी पक्ष नेते डॉ सुनील महाजन यांनी राजमुद्राशी बोलताना व्यक्त केली आहे.
दरम्यान, मनपाचे विरोधी पक्ष नेते सुनील महाजन हे जळगाव जनजागृती मंच च्या वतीने उमेदवारी करतील व आ. राजूमामा भोळे यांच्या समोर तगडे आव्हान उभे करणार अशी माहिती सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आली होती. यावरून मनपाचे विरोधी पक्ष नेते सुनील महाजन यांनी राजमुद्राशी संपर्क करीत हि माहिती दिली आहे. जिल्हा बँक निवडणूक संदर्भात सध्या राजकीय वातावरण तापले असून निवडणूक बिन विरोध व्हावी यासाठी सर्व पक्षीय पॅनलचे प्रयत्न सुरु आहे. तर काहींचे निवडणूक व्हावी यासाठी राजकीय प्रयत्न असल्याचे दिसून आले आहे.