जळगाव राजमृद्रा दर्पण । महापालिकेल्या आज झालेल्या ऑनलाईन महासभेत स्थायी समिती सदस्य, मनपा गटनेता आणि स्विकृत नगरसेवकाची नियुक्ती घोषणा होणार होती परंतु भाजपा नगरसेवकांच्या गोंधळा मुळे अखेर ही नियूक्ती देखील प्रलंबित राहीली ती होऊ शकली नाही. त्यामुळे सभागृहा बाहेर मनपाच्या आवारात शिवसेनेच्या कार्यकत्यानी मोठ्या प्रमाणात झेंडे फलक लावून परिसर भगवामय केला होतो. सेनेचे कार्यकर्ते विराज कावडीया आणि त्यांचे समर्थक सुरूवातीपासून आलेले होते. मात्र निवडीची जाहीर घोषणा होऊ न शकल्यामुळे शिवसैनिकांचा जल्लोष मावळला.
महापालिकेल्या प्रवेश व्दारापासून तर संर्पूण आवार भगवामय झालेला असल्याचे दिसून आले. विराज कावडीया यांच्या नावाची घोषणा महापौर आता करतील असा प्रत्येक क्षण जवळ येत होता परंतू मनपाच्या गटनेता निवडीवरून कायदेशीर तिढा निर्माण झाल्याने स्विकृत नगरसेवकाची घोषणा होऊ शकली नाही.
यावेळी मात्र अनेकांनी विराज कावडीया यांचे अभिनंदन केले.