जळगाव राजमृद्रा दर्पण । महापालिकेचा अधिकृत गटनेता कोण ? याविषयावरून सत्ताधारी आणि भाजपा यांनी कायद्यांचा चेंडू एकमेकडे टोलविला आहे. त्यामुळे सर्व नगरसेवकांमध्ये संभ्रमाने वातावरण पसरले असून प्रशासनाने देखील वेळ मारून नेण्याची भूमिका निभावली असल्याची चर्चा सुरु झाली आहे.
मनपाचे गटनेता भाजपाचे भगत बालाणी हेच असल्याचा दावा भाजपा नगरसेवकांनी केला आहे. त्यांची नोंद देखील विभागीय आयूक्तांकडे झाली असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. तर बंडखोर नगरसेवकांनी बैठक घेउन ॲड दिलीप पोकळे यांची गटनेते पदी निवडी केली असल्याचा दावा शिवसेनेच्या नगरसेवकांनी केला आहे. त्यामुळे महासभेत यावर अधिकृत कोणताही निर्णय होउ शकला नाही. ही सभा भाजपच्या गटत्याना विश्वासात न घेता घेण्यात आल्याने ती बेकायदेशीर होती. सभा रद्द करण्याची मागणी भगत बालाणी यांनी केल्यामुळे महापौरांनी हा निर्णय घेतल्याचा दावा भाजपाने केला आहे.
दरम्यान महासभा तहकूब झाल्या नंतर पत्रकाराशी बोलतांना माजी महापौर नितीन लढ्ढा म्हणले की, एकाच गटनेते पदासाठी दोन पक्षांनी दावा केला आहे. यावर विभागीय आयुक्त तसेच प्रशासनाने देखील अध्याप निर्णय घेतलेला नाही कारण हा विषय विभागीय आयुक्ताच्या अत्यारीत नसल्यामुळे कायदेशीररित्या निवडीचा तिढा कायम असल्याचे सांगितले . कायद्यात या संदर्भात काय तरतूद आहे हे अध्याप स्पष्ट होऊ न शकल्या मुळे हा गटनेता निवडीचा विषय मोठ्या पेच प्रसंगात सापडला आहे. यावेळी माजी महापौर शिवसेना नगर सेवक विष्णू भंगाळे, बंटी जाशी उपस्थित होते.