जळगाव राजमुद्रा दर्पण | महापालिकेच्या राजकीय वर्तुळात माजी मंत्री आणि भाजप नेते आ. गिरीश महाजन यांचे स्वीयसाहाय्यक आणि सामाजिक कार्यकर्ते अरविद देशमुख यांच्या माध्यमातून जोरदार कलाटणी मिळणार असून लवकरच आशिया खंडात नावाजलेल्या पालिकेवर भाजपचा झेंडा फडकणार आहे. कारण अनेक दिवसांपासून सत्ताधारी शिवसेना आणि भाजप मध्ये शीतयुद्ध सुरु असून यामुळे जळगाव शहराचा सर्वांगीण विकास आणि नागरिकांना दिलेल्या आश्वासनाची पुर्तता होत नसल्याने भारतीय जनता पार्टीने एक नवीन खेळी खेळली आहे.
अंतर्गत नाराजीमुळे भाजपच्या एकूण ३० नगरसेवकांनी बंडखोरी करीत महापौर व उपमहापौर निवडणुकी दरम्यान शिवसेनेच्या महापौराला मतदान केले होते, यामुळे ऐनवेळेत भाजपच्या बंडखोरांच्या भूमिके मुळे भाजपची सत्ता अल्पमतात आली त्या नंतर राजकीय गणिते बदलून शिवसेनेचा महापौर व बंडखोराचा उपमहापौर पालिकेवर निवडून गेला होता. भाजपने पुन्हा सात महिन्यानंतर राजकीय कोंडी करून शिवसेनेला मोठे शह दिले आहे, एकूण बंडखोरांमधील १६ नगरसेवक पुन्हा गळाला लावून भाजपने जोरदार राजकीय चेकमेट दिला आहे. भाजपच्या नेत्यांनी केलेल्या दाव्या नुसार सध्या ४३ संख्याबळ असून आणखी नगरसेवक संध्याकाळ पर्यत घरवापसी करण्याचे संकेत दिले आहे.
अरविद देशमुख यांनी काहीं दिवसांपासून महापालिकेत भाजपाची सत्ता यावी म्हणून राजकीय डावपेच आखण्यात सुरुवात केली. आ. गिरीश महाजन यांचे सूक्ष्म नियोजन आणि अरविद देशमुख यांची भाजप नगरसेवकांवरील पकड कामात आली सध्या महापालिकेत गट नेते पदावरून विविध राजकीय चर्चेला उधाण आले असले तरी भाजप मधून बंडखोरी करून शिवसेनेत गेलेल्या सत्तावीस नगरसेवकांना पुन्हा घरवापसी आणण्यात सुरुवात झाली आहे.
कारण अरविद देशमुख हे खऱ्या अर्थाने भाजपचे वजीर ठरले असून त्यांनी अतिशय नियोजन पूर्ण त्यांनी बाजपच्या नगरसेवकाना कायदेशीर तांत्रिक बाजू सांभाळून मार्गदर्शन केले तसेच बंडखोर नगरसेवकांचे ब्रेन वॉश करण्यात त्यांना यश मिळाले आहे. यापुढे भाजपा च्या माध्यमातून जळगावच्या विकासाला गती प्राप्त होईल यात तिळमात्र शंका नाही कारण पालिकेत लवकरच भाजपच्या रूपाने कोअर कमेटी स्थापन केली जाणार आहे, यात महत्वाची जबाबदारी देखील अरविद देशमुख यांच्या वर सोपवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
शिवसेना पालिकेत अल्पमतात येण्यासाठी भाजपने विविध खेळी खेळणे सुरु केले आहे. स्थायी समितीही शहराच्या दृष्टीने महत्वाची असून या तिजोरीच्या चाव्या भाजपकडे असल्याने शिवसेनेची मोठी गोची निर्माण झाली आहे. सत्तांतराच्या या घडामोडीत सध्या तरी भाजपचा वर चष्मा असून सेनेच्या अनेक नेत्यांना राजकीय धक्का बसणार आहे. यापुढे मनपाच्या राजकीय व्यासपीठावर नेमकं काय होते? याकडे लक्ष लागून आहे.