जळगाव राजमुद्रा दर्पण | मनपातील भाजपचे बंडखोर नगरसेवक स्वगृही परतण्याला सुरुवात झाली आहे. आणखी काही नगरसेवक स्वगृही परतण्याच्या तयारीत आहे त्यामुळे एकंदरीत मनपा मध्ये तयार झाल्याचे दिसून येत आहे. भाजप नेते आमदार गिरीश महाजन यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत बंडखोर नगरसेवकांनी पुन्हा भाजपमध्ये येण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.
भाजपने बहुमताचा आकडा पार केल्याचा दावा केला आहे. एकूण 43 नगरसेवक भाजपकडे असल्याचे भाजप सूत्रांनी कळविले आहे. या सर्व घडामोडी नंतर आगामी काळात भाजप सत्ता स्थापन करणार का ? तर याबाबत सत्ता स्थापनेचा दावा भाजपने फेटाळून लावला आहे. भाजप महापालिकेत सत्ता स्थापन करणार नसल्याचे भाजप नेत्यांनी स्पष्ट केले आहे. मनपात असलेल्या शिवसेनेच्या महापौर व उपमहापौर यांना शहर विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे भाजप नेत्यांनी सांगितले आहे.
भाजपने यामध्ये सत्ता स्थापनेचा दावा केला नसला तरी बहुमताचा दावा केला आहे एकूण 43 अधिक नगरसेवक आम्ही ोबत घेऊन मनपा मध्ये राजकारण करू असे भाजप नेत्यांनी सांगितले आहे राजकारणात काहीही होऊ शकते उद्या सेना-भाजप युती देखील होऊ शकते यामुळे आश्चर्य वाटण्याचे कारण नाही अशी प्रतिक्रिया आमदार राजू बाबू यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे शहराच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध असून आजपर्यंत झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो असे यावेळी आमदार भोळे म्हणाले आहे.