मुंबई राजमुद्रा दर्पण । महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी चाकणकरांच्या नावावर शिक्कामोर्बत झाल्याचा बातम्या आल्यानंतर चित्रा वाघ यांनी ट्विट करुन चाकणकरांवर बोचरी टीका केली. तर रुपाली चाकणकर यांनी चित्रा वाघ यांना 4 शब्दात उत्तर दिलं आहे.
“माझ्या नावावर शिक्कामोर्तब वगैरे अशा बातम्या प्रसारमाध्यमांमधून ऐकते आहे. माझ्यापर्यंत कोणतीही अशी माहिती नाही. राष्ट्रवादी महिला संघटनेचं उत्तम काम सुरु आहे. मी समाधानी आहे. इच्छा वगैरे असा काही विषय नाही. चित्राताईंच्या ट्विटवर मला काही प्रतिक्रिया द्यायची नाही”, असं रुपाली चाकणकर म्हणाल्या.
रुपाली चाकणकर म्हणाल्या, आमच्या प्रतिनिधींनी चाकणकर यांना पुन्हा पुन्हा चित्रा वाघ यांच्या टीकेवर विचारण्याचा प्रयत्न केला. पण ‘मला त्यांच्यावर बोलायचं नाही’, हे एकच वाक्य त्यांनी 4 वेळा उच्चारलं. जवळपास 2 मिनिटांच्या संभाषणामध्ये त्या ‘मला त्यांच्या टीकेवर काहीही बोलायचं नाही’, या एका वाक्यावर ठाम होत्या.
महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी तुमचं नाव निश्चित झालंय का?, असा प्रश्न विचारल्यावर त्या म्हणाल्या, “ज्या गोष्टीची मला काहीच कल्पना नाही, त्यावर मला काही बोलायचं नाही. माझ्या नावावर शिक्कामोर्तब वगैरे अशा बातम्या प्रसारमाध्यमांमधून ऐकते आहे. माझ्यापर्यंत कोणतीही अशी माहिती नाही. राष्ट्रवादी महिला संघटनेचं उत्तम काम सुरु आहे. मी समाधानी आहे. इच्छा वगैरे असा काही विषय नाही”