नवी दिल्ली राजमुद्रा दर्पण । देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक स्टेट बँक ऑफ इंडिया महागड्या मालमत्ता स्वस्तात खरेदी करण्याची संधी देत आहे. एसबीआयने 25 ऑक्टोबर रोजी गहाण ठेवलेल्या मालमत्तांसाठी दोन्ही व्यावसायिक आणि निवासी मालमत्तांसाठी ऑनलाईन लिलाव आयोजित केला आहे. ज्या लोकांना कर्जाच्या रूपात पैसे देते, त्याकरिता हमी म्हणून त्यांची निवासी मालमत्ता किंवा व्यावसायिक मालमत्ता इत्यादी तारण ठेवते. जर कर्जदार कर्ज परतफेड करण्यास असमर्थ असेल तर अशा परिस्थितीत बँक दिलेली कर्जे वसूल करण्यासाठी त्याच्या तारण मालमत्तेचा लिलाव करते. एसबीआय मेगा ई-लिलाव अंतर्गत, तुम्हाला सध्याच्या बाजार दरापेक्षा कमी किंमतीत काही घर, प्लॉट किंवा दुकान बोली लावण्याची आणि जिंकण्याची संधी आहे. एसबीआयने ट्विट करून यासंदर्भात माहिती दिली.
ज्या लोकांना कर्जाच्या रूपात पैसे देते, त्याकरिता हमी म्हणून त्यांची निवासी मालमत्ता किंवा व्यावसायिक मालमत्ता इत्यादी तारण ठेवते. जर कर्जदार कर्ज परतफेड करण्यास असमर्थ असेल तर अशा परिस्थितीत बँक दिलेली कर्जे वसूल करण्यासाठी त्याच्या तारण मालमत्तेचा लिलाव करते. याबाबत बँकेच्या संबंधित शाखा वर्तमानपत्र आणि अन्य माध्यमांद्वारे जाहिराती प्रसिद्ध करतात.