जळगाव राजमुद्रा दर्पण । जळगाव जिल्हा बँक निवडणूकीची रंगत वाढत असून सर्वपक्षीय पॅनलची घोषणा झाली मात्र काँग्रेसने भाजपासोबत निवडणूक लढविण्याचा विरोध केल्याने सर्वपक्षीय पॅनल अंधारीत आहे. तसेच निवडणूकीची अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यानुसार आज जळगाव जिल्हा बँक संचालकपदाच्या निवडणूकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते एकनाथ खडसे व त्यांच्या कन्या जिल्हा बँकेच्या अध्यक्षा ॲड.रोहिणी खडसे यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणूकीसाठी प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यानुसार एकनाथराव खडसे सद्या मुंबई येथे रूग्णालयात उपचारार्थ दाखल आहेत. त्यांच्या तर्फे सूचक म्हणून अतुल युवराज पाटील यांनी उमेदवारी दाखल केला आहे, मुक्ताईनगर विविध कार्यकारी सोसायटी गटातून खडसे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे. तर कन्या जिल्हा बँकेच्या अध्यक्षा ॲड.रोहिणी खडसे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर जिल्हा बँकेच्या अध्यक्षा ॲड.रोहिणी खडसे यांनी जिल्हा महिला आणि मुक्ताईनगर विविध कार्यकारी सोसायटी गटातून अर्ज दाखल केला आहे.
या शिवाय जळगाव जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड.रविंद्र पाटील यांनी बोदवड विविध कार्यकारी सोसायटी, माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी ईतर गटातून तर माजी मंत्री डॉ.सतीश पाटील यांनी ओबीसी गटातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. जळगाव जिल्हा बँक निवडणूकीत सर्वपक्षीय पॅनलची घोषणा करण्यात आली परंतू भाजपासोबत निवडणूक न लढविण्याचे कॉंग्रेसने भूमीका घेतल्याने आता शिवसेना, राष्ट्रवादी कॉंगेस यांची महाविकास आघाडी एकत्र लढविण्याचे हालचाली सुरू झाली आहे.