पारोळा राजमुद्रा दर्पण । पारोळा येथे पैशाच्या वादातून 28 वर्षीय विवाहितेला मारहाण करत जबरदस्तीने आईसमोर विष पाजून तिचा खून केल्याची घटना ता. 13 रोजी सकाळी नऊ वाजता धरणगाव रस्ता जवळील एका शेतात ही घटना घडली.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, बुधवार रोजी सकाळी उषाबाई प्रकाश खाडे रा.राजीव गांधी नगर पारोळा या आपली विवाहित मुलगी पूजा संदीप शिंदे तिच्या सोबत शेतात काम करत होत्या. अचानक झोडगे येथील रहिवासी संशयित पंकज हिलाल चौधरी हा दुचाकीने शेतात आला त्याने माझे पंधरा हजार रुपये द्यावे अशी मागणी करत पूजाला मारहाण केली. पती त्रास देत असल्याने ती दोन वर्षापासून माहेरी होती. मी कोणतेही पैसे घेतले नाही पती किंवा सासरे यांनी पैसे घेतले असतील असे पूजाने त्याला सांगितले. मात्र संशयित चौधरीने काहीही ऐकून न घेता पूजाचा गळा दाबला तसेच जवळचे पडलेले विषारी औषध तिला पाजले. पूजाच्या आई समोरच ही घटना घडली. पूजाची आई उषाबाई खाडे यांनी विरोध केला त्यांच्यात झटापटी झाली मात्र त्यांना ढकलून दिले.
या घटनेनंतर संशयीत पंकज चौधरी घाबरला त्याने पूजाला दुचाकीवर बसून पारोळा कुटीर रुग्णालयात आणले त्यानंतर संशयित पसार झाला. उपचारादरम्यान पूजाचा मृत्यू झालेला आहे. याप्रकरणी पारोळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलिस करीत आहे.