जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | महापालिकेत निधी वाटपाचे राजकारण सत्ता बदला नंतर देखील संपायला तयार नाही, महासभेत घेण्यात आलेले विषय ऑनलाइन मिटींग च्या माध्यमातून बहुमत सिद्ध न करता मंजूर करण्यात आल्या चा नवा वाद भाजपकडून मनपा मध्ये उफाळण्यात आला त्याच पार्श्वभूमी नव्याने सेनेशी जुळवून घेतलेल्या व सत्तेत सामील असलेल्या नगरसेवकांमध्ये निधी वाटपा मुळे वादाची ठिगणी पडल्याची जोरदार चर्चा महापालिकेच्या आवारात रंगली आहे.
सत्ता स्थापन करण्यात आमचा देखील वाटा
प्रत्यक्षात निधी वाटपाच्या भेदभावावरून मनपाच्या दुसऱ्या माळावर चांगलेच घमासान झाल्याचे माहिती मिळत आहे मात्र भाजपचे बंडखोर नवग्रह या प्रकरणात मध्यस्ती करीत वातावरण शांत करण्याच्या प्रयत्नात आहे. ” निधी द्यायचा असेल तर आम्हाला देखील समसमान दिला पाहिजे सत्ता स्थापन करण्यात आमचा देखील वाटा असून असा भेदभाव होणे योग्य नाही ” असे खडेबोल देखील एका नगरसेविकेच्या पतीने बंद दाराआड सुनावल्याचे सांगितले जात आहे.
काही नगरसेवकांमध्ये भीती
आगामी दोन वर्षानंतर महापालिकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजणार आहे, भाजपने राज्यात सत्ता असताना एका वॉर्डात चार नगरसेवक लढतील असे नियोजन केले होते यामध्ये भाजपचे रेकॉर्ड ब्रेक असे यश मिळाले मात्र इतर पक्षांना यामध्ये अपयश आले राज्यात सत्ता पालट झाले आणि महाविकास आघाडीचे सरकार आले आणि पुन्हा आता प्रत्येकी वॉर्डात एक नगरसेवक अशी रचना असणार आहे. म्हणूनच गेल्या अडीच वर्षात पाहिजे तेवढी कामे झालेली नाही यामुळे नागरिकांमध्ये देखील नगरसेवकां बद्दल बोंबाबोंब आहे. येणाऱ्या दोन वर्षात पुन्हा निवडून यायचे असेल तर येत्या दोन वर्षात वॉर्डात कामे झाली पाहिजे अन्यथा नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागू शकते अशी भीती काही नगरसेवकांना आहे.
आपल्या वॉर्डात लागणारा पाहिजे तितका निधी मिळवण्यासाठी प्रत्येकाची धडपड महापालिकेत बघायला मिळत आहे. अमृत योजना,ड्रेनेज गटार च्या कामामुळे प्रत्यक्षात नागरिकांच्या ध्यानीमनी येईल असे लक्षणीय कामे वॉर्डात झालेली नाही वॉर्डात नाराजी नको म्हणून नगरसेवक खबरदारी घेताना दिसून येत आहे.