कारवाईत १ लाखाच्या किंमतीचा मुद्देमाल जप्त
जामनेर राजमुद्रा दर्पण | तालुक्यातील माळपिंप्री, हिवरखेडा, भागदरा या गावच्या परिसरात जामनेर पोलिसांकडून अवैध दारूच्या हातभट्टया नष्ट करत धडक कारवाईत एक लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.जामनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली स.फौ संजय पाटील,पो.हे.कॉ.सुनिल राठोड,विलास चव्हाण,विजय जोशी,पो.ना.राहुल पाटील, अतुल पवार,संदीप सुर्यवंशी,हंसराज वाघ पो.कॉ.जितेंद्र ठाकरे,निलेश घुगे यांच्या पथकाने हि कारवाई करत माळपिंप्री,हिवरखेडा,भागदरा गावच्या भागात अवैध पणे गावठी हातभट्टी चालवून दारू तयार करणाऱ्या रामदास जोगी राहुल जोगी(रा.भाागदरा) आकाश दिपक जाधव
(रा.माळपिंप्री) अनिल बाजीराव पाटील,दिनकर दिगडू बोरसे दोन्ही (रा.हिवरखेडा)या आरोपींना ताब्यात घेत.हि कारवाई केली. जामनेर पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक किरण शिंदे यांच्या अवैधपणे गावठी हातभट्टी दारू बंदच्या धडक कारवाईचे सुज्ञ नागरिकांमधुन स्वागत व अभिनंदन होत आहे. तर अवैधपणे हातभट्टया चालविणारांचे धाबे दणाणले आहे.