मुंबई राजमुद्रा दर्पण । राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरॊप केले आहे. फ्लेचर पटेलसोबत फोटोत असलेली लेडी डॉन कोण आहे? या लेडी डॉनचा तुमच्याशी संबंध काय? तिचं बॉलिवूडशी काय कनेक्शन आहे? असे सवाल नवाब मलिक यांनी वानखेडेंना केले आहेत. या प्रकरणातील लेडी डॉन कोण आहे? तिच्याशी तुमचा संबंध काय आहे? असा सवाल मलिक यांनी केला. ही लेडी डॉन एका पक्षाच्या चित्रपट सेनेची कार्यकर्ती आहे. ती वकील आहे. तसेच वानखेडेंची लेडी डॉन नातेवाईक असून फ्लेचर पटेल तिला लेडी डॉन संबोधत असल्याचंही मलिक यांनी सांगितलं. ही लेडी डॉन बॉलिवूडमध्ये दहशत निर्माण करण्याचं काम करत आहे का? काही रॅकेट सुरू आहे का? मुंबईत काही खेळ सुरू आहे का? असा सवाल मलिक यांनी उपस्थित केला. तसेच, फ्लेचर पटेल त्यांच्या सोशल मीडियावर वानखेडेंच्या कुटुंबीयांसोबत फोटो टाकत आहेत. माय सिस्टर लेडी डॉन नावाने टॅग करत आहेत. त्यामुळे वानखेडेंचा या फ्लेचर पटेलशी संबंध काय आहे हे त्यांनी सांगावं, असंही मलिक म्हणाले.
सीआरपीसी कायद्यात एकच पंच वारंवार घेतला जात असेल तर केसेसमध्ये दम नसतो अनेकदा हे कोर्टाने सांगितलं आहे. या तीन केसेसमध्ये फ्लेचर पटेल पंच कसे झाले यांचं उत्तर वानखेडेंनी द्यावं? तसेच या सर्व प्रकरणाशी लेडी डॉनचा काय संबंध आहे? ही लेडी डॉन कोण आहे? हे रॅकेट काय आहे? लेडी डॉनच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये दहशत निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे का?, असा सवाल त्यांनी केला.
फ्लेचर पटेल हा समीर वानखेडे यांचा फॅमिली फ्रेंड आहे. ते वानखेडेंच्या पब्लिसिटीसाठी कार्यक्रम आयोजित करत असतात. त्यांचे फोटोही मी ट्विटरवर टाकले आहेत. साधारणपणे एखादा गुन्हा घडतो तेव्हा आजबाजूच्या लोकांना बोलावून पंचनामा केला जातो. माझ्याकडे पंचनाम्याचे फोटो आहेत. फ्लेचर पटेलने कोणते कार्यक्रम आयोजित केले ते फोटो ट्विटरवर टाकले आहेत. माय सिस्टर लेडी डॉन त्यांचेही फोटो टाकले आहेत, असं मलिक म्हणाले.
मी गेल्या वर्षभरातील एनसीबीच्या केसेसची माहिती घेतली. त्यात तीन केसेसची माहिती संदिग्ध वाटली. सीआर नंबर 38/20 सर्च ऑपरेशन करण्यात आलं. 25 नोव्हेंबर 2020मध्ये छापा मारला. त्यात फ्लेचर पटेल पंच करण्यात आले. त्यानंतर सीआर नंबर 16/ 20मध्ये 9 डिसेंबर 2020 रोजी सर्च ऑपरेशन करण्यात आलं. त्यात फ्लेचर पटेल पंच आहे. तिसरी केस आहे सीआर नंबर 2/21 आहे. त्यानुसार 2 जानेवारी 21 ला छापेमारी करण्यात आली. त्यातही फ्लेचर पटेल पंच आहेत. फ्लेचर पटेल इंडिपेंडंट पंच आहेत असं सांगता मग ते तुमचे फॅमिल फ्रेंड कसे? पंचनाम्यासाठी जवळच्या लोकांना घेता. याचा अर्थ ही कारवाई ठरवून केली का? असा सवाल त्यांनी केला.