भुसावळ राजमुद्रा दर्पण । भुसावळ येथील बबलू खान यांची प्रहार जनशक्ती पार्टीच्या जळगाव जिल्हाध्यक्ष सोशल मीडिया सेल पदावर नियुक्ती करण्यात आली. दि. १६ शनिवार रोजी मुंबई येथे प्रहार प्रदेशाध्यक्ष अनिल गावंडे यांच्या हस्ते व उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिलभाऊ चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत नियुक्ती पत्र देण्यात आले.
बच्चूभाऊ कडू यांच्या विचारांनुसार पुढील काळात प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून सर्वसामान्य युवकांच्या विकासात आपण भरीव कार्य कराल. पक्ष संघटना मजबूतीने उभी कराल ही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. बबलू खान यांच्या नियुक्तीने जिल्ह्यातील प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले.