(जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा) जळगांव जिल्हा महानगर भा.ज.पा. ऑटो रिक्षा स्कुल व्हॅन आघाडी तर्फे स्वयंसहाय्यक निवासी उपजिल्हाधिकारी जळगांव यांना ऑटो रिक्षा, स्कुल व्हॅन चालकांना आर्थिक मदतीसह बॅक हप्ते कोरोना काळात माफ करावे व इतर मागण्याचे निवेदन देण्यात आले. या प्रसंगी जळगाव जिल्हाअध्यक्ष प्रमोद वाणी व सुभाषचंद्र बोस रिक्षा युनियन उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रल्हाद सोनवणे, भा.ज.पा.महानगर ऑटो रिक्षा स्कुल व्हॅन उपअध्यक्ष संदीप (संजय)वाणी, नेताजी सुभाष बोस रिक्षा युनियन उपअध्यक्ष दिलीप वाघ, सचिव सुनिल चौधरी, राजेश माळी, दिपक माळी, गणेश माळी, मिंलीद आहिरे, दिनेश भावसार, प्रकाश बडगुजर, वसंत झुंजारराव, नाना वाणी, सुनिल वाणी, सुनिल चौधरी उपस्थित होते.
या मागण्या करण्यात आल्या.
1) चालक मालक यांना 10000 रु आनुदान देण्यात यावे.
2) 2020ते 2021 हे कोरोना वर्ष घोषीत करण्यात यावे.
3) शाळा चालु होत नाही तो पर्यत बस स्टाॅप वरुन 50 कि मी अंतरापर्यत वाहन चालवण्याची परवानगी देण्यात यावी.
4) सर्व बॅक व फायनन्स चे हप्ते फेडण्यासाठी 1 वर्ष मुदत वाढ मिळावी व त्यावरील व्याज माफ करण्यात यावे.
5) रिक्षाची मर्यादा 15 वर्षेऐवजी 20 वर्षे करण्यात यावी. स्पीड गर्वनर प्रमाणपत्राला लागणारी फी 1400 रु.ऐवजी 100 रु करण्यात यावी.
6) इन्शुरन्स रक्कम मध्ये कपात करण्यात यावी.
7) जो पर्यत शाळा पुरर्वत होत नाही तो पर्यत घरपट्टी (टॅक्स) व विज बिलमध्ये मुभा देण्यात यावी.
8) विधान भवनात आम्हाला आमचे प्रश्न मांडण्या करीता कायमस्वरुपी स्थान देण्यात यावे.